
-राजकुमार शहा
मोहोळ : राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी मोहोळ च्या रेल्वे प्रश्नी लक्ष घातले असुन,कोरोना काळा पासून मोहोळ रेल्वे स्थानकावर पूर्वी थांबत असलेल्या रेल्वे थांबणे बंद झाल्या आहेत. तेव्हा पासून अद्याप पर्यंत मोहोळ रेल्वे स्थानकावर सोलापूर पुणे पॅसेंजर वगळता एक ही रेल्वे थांबत नाहीत. त्यामुळे मोहोळ शहरासह तालुक्यातून पुणे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी पूर्वी प्रमाणे रेल्वे थांबाव्यात अशी मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.