Kalicharan Maharaj : हिंदूंना धर्मशिक्षित करणे गरजेचे : कालिचरण महाराज; धर्मरक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रम
Solapur News : ओम काली हिंदवी स्वराज्य सेनच्या सोलापूर शाखेच्या वतीने हिंदू धर्माच्या कार्यात सदैव तत्पर असणाऱ्या धर्माभिमान्यांना त्यांच्या विशेष कार्याबद्दल ‘धर्मरक्षक’ पुरस्कार शिवस्मारक सभागृहात आयोजित कार्यक्रमात देण्यात आला.
Kalicharan Maharaj speaking at the Dharma Rakshak Award ceremony, stressing the need for religious education for Hindus.Sakal
सोलापूर : हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आज हिंदू धर्मावर होणारे आघात वाढत आहेत. हिंदूंना धर्मशिक्षित करणे आणि धर्मरक्षणासाठी सिद्ध करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन कालीपुत्र कालिचरण महाराज यांनी केले.