लाल मातीतुन घडलेला भारतीय वनसेवेतील अधिकारी धर्मवीर सालविठ्ठल

भारतीय वनसेवेतून उपवनसंरक्षक अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
solapur
solapursakal

उपळाई बुद्रूक : इंग्रजी व्यवस्थित जमत नसल्याने, बारावीनंतर कुस्ती स्पर्धेत नशीब अजमावयाचे म्हणून पैलवान होण्यासाठी तालीम लावली. पण वेळोवेळी आलेल्या अनुभवामुळे लाल मातीत तयार झालेला हा रांगडा पैलवान, वेगळं काही तरी करून दाखवण्याची जिद्द बाळगून, अपार कष्ट व मेहनत घेऊन राज्य वनसेवेतून सहाय्यक वनसंरक्षक पदापासून प्रवास करत आज भारतीय वनसेवेतून उपवनसंरक्षक अधिकारी म्हणून कार्यरत आहे. धर्मवीर सालविठ्ठल त्यांची ही प्रेरणादायी यशोगाथा.

solapur
लोढा यांची राज्यपालांकडे धाव; मलिक यांच्याविरुद्ध तक्रार

पंढरपूर तालुक्यातील सुस्ते हे गाव. परंपरागत शेती हा कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय. आई-वडील मोठे दोन भाऊ सर्वजण शेती करत कुटुंबाचा गाडा हाकत शिक्षणासाठी पैसे पुरवत असत. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत तर अकरावी व बारावीचे शिक्षण पंढरपूर येथील विवेकवर्धनी विद्यालयात झाले. दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन देखील अभ्यासात सातत्यपणा व इंग्रजी थोडे कच्चे असल्याने, बारावीत अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत. त्यामुळेच भविष्य अंधकारमय झाले असे वाटत असताना, लहानपणापासूनच कुस्तीची आवड असल्याने, कोल्हापूराला जाऊन कुस्ती क्षेत्रात नशीब अजमावयाचे असे स्वप्न बाळगून कोल्हापुरात तीन वर्षे कुस्तीसाठी कसरती केल्या.

solapur
नागपूरमध्ये लसीकरणाचा ३५ लाख डोसचा टप्पा पार

याकाळातच बीएससीचे शिक्षण देखील कसेबसे पुर्ण केले. गावाकडून आई-वडील भाऊ पैसे पाठवत असल्याने कशाचीही उणीव भासत नव्हती. परंतु अचानक आलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे, गावाकडून येणारे पैसे बंद झाले अन् आपण काय आहोत. याची जाणीव झाली. त्यामुळे आपण काहीतरी केले पाहिजे असा विचार मनात घोंघावत असताना. भाऊ व वडिलांनी धीर दिला. 'तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस' असं पाठबळ देत धीर दिला. कुटुंबीय आपल्यासाठी काहीही करण्यास तयार आहे तर आपण कशाला मागे सरायचे. म्हणून त्यावेळी अनेकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार शिवाजी विद्यापीठातून एमएससी केले. खऱ्या अर्थाने इथूनच स्पर्धा परीक्षेची ओळख झाली. इथे शिक्षण घेत असताना अभ्यास करणाऱ्या मित्रांचा चांगला ग्रुप मिळाला. अन् आयुष्याला कलाटणी मिळाली.

solapur
'राणीच्या बागेतील भ्रष्टाचार प्रकरणी राज्यपालांकडे तक्रार देणार'

कोल्हापुरातून सुरू झालेला हा स्पर्धा परीक्षेचा प्रवास नंतर पुण्यातील अभ्यासिकेत सुरू होता. त्यावेळी स्पर्धा परीक्षेची प्रक्रिया तीन वर्षे चालत असायची. कुटुंबीयांचे पाठबळ, मित्रांचे सहकार्य आणि जिद्दीच्या जोरावर एकाच वेळी पोलीस उपनिरीक्षक व इंटेलिजन्स ब्युरो या पदासाठी निवड झाली. तर दुसरीकडे राज्यसेवेच्या मुलाखतीपर्यंत पोहचलो होतो. नोकरीची गरज असल्याने तातडीने, इंटेलिजन्स ब्युरोची नोकरी स्वीकारली. प्रशिक्षण घेऊन जवळपास दोन ते तीन वर्षाचा कालावधी या क्षेत्रात काम केले. नोकरी करत अभ्यास मात्र सुरू होता. अनेक वर्षाच्या कालावधीनंतर राज्यवनसेवेची परिक्षेची जाहीरात आली.

त्यामुळे स्पर्धा मोठ्या प्रमाणावर होती. नोकरी सांभाळत जिद्द व चिकाटीने अभ्यास करून ती परीक्षा दिली अन् राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. राज्य वनसेवेतून सहाय्यक वनसंरक्षक म्हणून सुरू झालेला हा प्रवास आज भारतीय वनसेवेत उपवनसंरक्षक अधिकारी (IFS) पदापर्यंत पोहचला आहे. या काळात जनतेच्या सामाजिक कार्यात मदत करता आली याचे समाधान वाटतो. परंतु वेळोवेळी घेतलेल्या निर्णयामुळे व कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळे हे यश संपादन करता आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com