esakal | बिबट्याच्या शिकारीसाठी धवलसिंह मोहिते- पाटीलांना 'यामुळे' निवडले ! बिबट्याला ठार मारण्याची परवानगी केव्हा मिळते माहितीय का?
sakal

बोलून बातमी शोधा

0man_eater_leopaard - Copy.jpg

बिबट्या तथा अन्य वन्य प्राण्यांना 'का' दिली जाते मारण्याची परवानगी

  • नरभक्षक बिबट्याचे माणसांवरील वाढले होते हल्ले
  • बीड, नगर, सोलापूर (करमाळा) येथील नऊजणांचे बिबट्याने घेतले होते बळी
  • स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती बिबट्याला ठार मारण्याची मागणी; परिसरात निर्माण झाली होती दशहत
  • बिबट्या असो वा अन्य कोणताही वन्य प्राण्यांचे हल्ले वाढल्यानंतरही तो सापडत नसल्यास वन्यजीवांबद्दल निर्माण होते तिरस्काराची भावना

बिबट्याच्या शिकारीसाठी धवलसिंह मोहिते- पाटीलांना 'यामुळे' निवडले ! बिबट्याला ठार मारण्याची परवानगी केव्हा मिळते माहितीय का?

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : सध्या साखर हंगाम सुरु असल्याने उसतोड कामगारही बहूतांश ठिकाणी शेतातच वास्तव्यास होते. बिबट्याचे मानवांवरील हल्ले वाढले होते. तर करमाळा, माढा तालुक्‍यातील लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निमाण झाले होते. अशा परिस्थितीत बिबट्याला ठार करणे हाच पर्याय रास्त होता. नाहीतर वन्यजीवांविषयी मानवांमध्ये तिरस्काराची भावना निर्माण झाली असती, असे पुण्याचे मुख्य वनसंरक्षक डी. एस. सोडल यांनी स्पष्ट केले.

बिबट्या तथा अन्य वन्य प्राण्यांना 'का' दिली जाते मारण्याची परवानगी

  • नरभक्षक बिबट्याचे माणसांवरील वाढले होते हल्ले
  • बीड, नगर, सोलापूर (करमाळा) येथील नऊजणांचे बिबट्याने घेतले होते बळी
  • स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती बिबट्याला ठार मारण्याची मागणी; परिसरात निर्माण झाली होती दशहत
  • बिबट्या असो वा अन्य कोणताही वन्य प्राण्यांचे हल्ले वाढल्यानंतरही तो सापडत नसल्यास वन्यजीवांबद्दल निर्माण होते तिरस्काराची भावना


बिबट्याचे हल्ले दिवसेंदिवस वाढत होते. त्याला पकडण्यासाठी सापळे, ट्रॅंक्‍यूलायझर गन, कॅमेरे आणि डॉग स्कॉडसह 26 पथके तैनात असतानाही बिबट्या सापडत नव्हता. अशा परिस्थितीत वेळ कमी होता. बिबट्याला पकडण्याची कार्यवाही तेथील दाट उसामुळे, केळीमुळे होऊ शकली नाही. त्यामुळे बिबट्याला ठार मारण्याची वरिष्ठ स्तरावरुन परवानगी मिळाली. बिबट्याला ठार करताना तिन्ही बाजूनी पाणी होते. मात्र, एका बाजूचे जमिनीचे क्षेत्रही मोठे होते. त्या परिस्थितीत त्याला जिवंत पकडणे मुश्‍किल होते. त्यामुळे त्याला हर्षवधन तावरे यांच्या पथकातील धवलसिंहांनी गोळ्या घालून ठार केल्याचेही श्री. दोडल म्हणाले. तेथील स्थानिक लोकप्रनिधींसह नागरिकांना विचारूनच त्या परिसराची जाण असलेल्या खासगी व्यक्‍तींची निवड केली जाते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, नगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील उजनी परिसरात अद्याप काही वन्यजीव असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे. 'जगा आणि जगू द्या' या भावनेतून खबरदारी घ्यावी, असे आवाहन सोलापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांनी केले आहे.


धवलसिंहांची का झाली निवड...
बिबट्याचे मानवांवरील हल्ले वाढले होते. त्याने बीड, नगर, सोलापूर (करमाळा) येथील नागरिकांचे जीव घेतले होते. त्यामुळे नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून ठार करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर वन्यजीव संरक्षक कायदा 1972 अंतर्गत त्या परिसराची जाण असलेल्या त्या परिसरातील खासगी व्यक्‍तींची नियुक्‍ती करण्याचे ठरले. तत्पूर्वी, धवलसिंह मोहिते- पाटील यांनी त्या परिसराची माहिती असल्याचे सांगितले. त्यांना जंगलात राहण्याचाही अनुभव असून ते चपळ असल्याचे वन विभागातील अधिकाऱ्यांना नागरिकांनी सांगितले. त्यांच्याकडे स्वत:ची परवानाधारक बंदूकही होती आणि ते स्वत:हून मदतीसाठी पुढे आले. त्यामुळे बारामती येथील हर्षवर्धन तावरे यांच्या पथकात धवलसिंह मोहिते- पाटील यांचा समावेश करण्यात आल्याचे पुण्याचे वनसंरक्षक एस. डी. दोडल यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

loading image