पोलिसांची 'डायल 112' सेवा लवकरच! अत्याधुनिक यंत्रणा, प्रशिक्षित कर्मचारी

पोलिसांची "डायल 112' सेवा लवकरच ! अत्याधुनिक यंत्रणा व प्रशिक्षित कर्मचारी
पोलिसांची "डायल 112' सेवा लवकरच ! अत्याधुनिक यंत्रणा व प्रशिक्षित कर्मचारी
पोलिसांची "डायल 112' सेवा लवकरच ! अत्याधुनिक यंत्रणा व प्रशिक्षित कर्मचारी Canva
Summary

मागील सेवेच्या तुलनेत अधिक वेगवान मदत नागरिकांना मिळणे शक्‍य होणार आहे.

सोलापूर : पोलिस (Police) खात्याकडून पूर्वी सुरू असलेल्या डायल 100 (Dial 100) ही सेवा बदलून आधुनिक पद्धतीची एमडीटी बेस्ड डायल 112 (Dial 112) ही सेवा लवकरच सुरू होणार आहे. यामुळे मागील सेवेच्या तुलनेत अधिक वेगवान मदत नागरिकांना मिळणे शक्‍य होणार आहे. या सेवेची जय्यत तयारी पोलिस दलाने सुरू केली आहे. सोलापूर पोलिस (Solapur Police) दलात यापूर्वी नागरिकांना 100 नंबरवर डायल केल्यानंतर पोलिसांशी संपर्क साधून तातडीची मदत मिळावी अशी सोय होती. पण या क्रमांकाची सेवा अत्यंत प्राथमिक स्वरूपाची होती. कोणतीही माहिती आल्यानंतर त्याचे विश्‍लेषण करून मदतीसाठी ही सेवा अपूर्णच होती. तसेच तक्रारीची खातरजमा करण्यासाठी कोणतीच यंत्रणा कार्यान्वित केलेली नव्हती. केवळ एखाद्या घटनेची जुजबी सूचनावजा माहिती असे त्याचे स्वरूप होते. नागरिकांना त्यावरून तातडीने कोणतीही वैयक्तिक मदतीची सेवा देखील देता येत नव्हती.

पोलिसांची "डायल 112' सेवा लवकरच ! अत्याधुनिक यंत्रणा व प्रशिक्षित कर्मचारी
कलवरी ऑर्केस्ट्रा बार प्रकरण : दोघांना पोलिस कोठडी; बार मालक फरार

यामुळे आता डायल 112 ही आधुनिक सेवा पोलिस दलाकडून सुरू केली जात आहे. ही सेवा एमडीटी तंत्रज्ञानावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे तक्रारदाराचे लोकेशन ट्रेस करून कमी कालावधीत त्यास मदत करता येणार आहे. तसेच या कंट्रोल रूमच्या कार्यवाहीसाठी स्वतंत्र प्रशिक्षित पथक असणार आहे. पथकासाठी विशेष दुचाकी व चारचाकी वाहने दाखल झाली आहेत. लवकरच पोलिसांचे प्रशिक्षण दोन महिन्यांसाठी होईल. त्यानंतर संपूर्ण तयारी झाल्यावर ही सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. त्यामुळे सोलापूर पोलिसांना राज्याच्या सीमेवर अधिक चांगले नियंत्रण करता येणार आहे. स्थानिक नागरिकांना तत्काळ सेवा देत असताना आंतरराज्य गुन्हेगारीचा छडा लावण्यास डायल 112 प्रभावी ठरणार आहे.

पोलिसांची "डायल 112' सेवा लवकरच ! अत्याधुनिक यंत्रणा व प्रशिक्षित कर्मचारी
दिलीप धोत्रे यांची मनसेच्या नेतेपदी निवड !

ठळक बाबी...

  • पूर्वीची 100 सेवा होणार बंद

  • डायल 112 पूर्णपणे डिजिटल तंत्रज्ञान व जीपीएस प्रणालीवर आधारित

  • नव्या सेवेसाठी दोन महिन्यांचे प्रशिक्षण

  • पोलिसांना प्रकल्पासाठी 13 दुचाकी व 14 चारचाकी वाहने

  • चारचाकी वाहनावर एमडीटी यंत्रणा बसवली

  • नियंत्रण कक्षात 9 एमडीटी संच कार्यान्वित

  • दोन पर्यवेक्षक, 16 प्रेषक व 42 प्रतिसादक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण

डायल 112 ही सेवा अधिक कार्यक्षम असणार आहे. नागरिकांना तत्काळ मदतीचे पाठबळ या सेवेतून मिळणार आहे. गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही सेवा प्रभावी ठरेल.

- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com