esakal | कोरोना काळात असा घ्यावा आहार 
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

रोग प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी आणि कोणत्याही वयात आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी दररोजच्या जीवनशैलीत हे बदल करावेत. शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी फळांचा रस, फळे, सरबत घ्या. गहू व तांदूळ तसेच ज्वारी, मिश्रित धान्य हे ऊर्जा वाढविण्याकरिता आवश्‍यक असून ते विचारकार्य आणि रोगापासून बचाव करतात. 

कोरोना काळात असा घ्यावा आहार 

sakal_logo
By
प्रशांत देशपांडे

सोलापूर  : कोविड-19, साथीचा रोग देशभर तसेच जगभर पसरलेला असल्याने त्याला प्रतिसाद म्हणून सर्वच नागरिकांना घरात राहण्यास सांगितले आहे. नवीन विषाणूने दैनंदिन जीवनात अवास्तव बदल घडवून आणला आहे. प्रत्येक नागरिकाने प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चांगला आहार घ्यावा. 
निसर्गाने आपल्याला अद्‌भुत शक्ती प्रदान केली आहे. ज्याद्वारे आपले नैसर्गिक संरक्षण होते. विविध प्रकारचे जिवाणू-विषाणू आणि विनाशकारी पेशींना लढा देऊन रोगप्रतिकारक शक्‍ती आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करते. अशी आपली रोग प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी आणि कोणत्याही वयात आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी दररोजच्या जीवनशैलीत हे बदल करावेत. शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी फळांचा रस, फळे, सरबत घ्या. गहू व तांदूळ तसेच ज्वारी, मिश्रित धान्य हे ऊर्जा वाढविण्याकरिता आवश्‍यक असून ते विचारकार्य आणि रोगापासून बचाव करतात. 

हेही वाचा : विधानपरिषदेसाठी भाजप कडून रणजितसिंह यांचे नाव अंतिम 

विशेषतः मुलांची शारीरिक व बौद्धिक वाढ होण्यासाठी तसेच आपण अस्वस्थ असतो तेव्हा अशा ऊर्जेची गरज असते. यासाठी संतुलित आहाराचे सेवन करणे गरजेचे आहे. धान्य व तृणधान्य म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, मका व मिश्रित धान्य यासोबत डाळी यांचा समावेश असणे गरजेचे आहे. आहारासोबत रात्रीची चांगली झोप योग्य आरोग्य राखण्यासाठी आवश्‍यक असते. आहारातील अनियमितता व पुरेशी झोप नसल्याने मोठ्या रोगास कारणीभूत होऊ शकते. सर्वसाधारण सर्दी ही किरकोळ समस्या असते, पण संबंधित रोग हा तुलनेने मोठ्या समस्या निर्माण करतात. साधारण सहा ते आठ तासांची झोप हे एक उत्तम रोगप्रतिकारक शक्तीकरिता महत्त्वाचे ठरते. संचारबंदी काळात शरीर सक्रिय नसल्याने घरबसल्या योगा, ध्यानधारणा अशा व्यायामाची निवड करावी, तसेच या काळात लठ्ठपणा असणाऱ्यांनी ट्रान्स फॅट (प्रती चरबीयुक्त) पदार्थ टाळावेत. 

हेही वाचा : लोक घरासमोर थांबू देईनात... फळे कशी विकणार? 

निरोगी असेल त्यांच्या शरीर स्वास्थ्यात कसलाही बिघाड होत नाही 
निरोगी जीवन हेच खरे सुख या उक्‍तीनुसार ज्यांचे शरीर बलवान व निरोगी असेल त्यांच्या शरीर स्वास्थ्यात कसलाही बिघाड होत नसतो. ते आपले कार्य उत्तम प्रकारे पार पाडत असतात, अशांना सुखी समजावे. "शरीर माध्यम खलु धर्मसाधनम्‌' असे म्हणतात ते खोटे नाही. ज्या आहाराने आपला शारीरिक विकास उत्तम प्रकारे होतो, आपल्याला चैतन्य, प्रसन्नता व शक्ती प्राप्त होऊन आपले शरीर निरोगी व सुदृढ होते, तोच आहार सुयोग्य व आदर्श समजावा, आहार हेच औषध आहे. 
-डॉ. देवकी डोंगरकर, आहारतज्ज्ञ 

 

loading image