Pomegranate Production : निर्यातक्षम डाळींब उत्पादनासाठी रोगमुक्त रोपे तसेच उत्तम एकात्मिक व्यवस्थापन आवश्यक - डॉ. सोमनाथ पोखरे

शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या म्हणीप्रमाणे जर शेतकऱ्याला निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पन्न घ्यायचे असेल तर रोपांची निवड अत्यंत महत्त्वाचे आहे.
Dr. Somnath Pokhare
Dr. Somnath Pokharesakal

सलगर बुद्रुक - शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या म्हणीप्रमाणे जर शेतकऱ्याला निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पन्न घ्यायचे असेल तर रोपांची निवड अत्यंत महत्त्वाचे आहे. रोप जर कीड व रोगमुक्त असतील आणि सुदृढ असतील तसेच उत्तम एकात्मिक व्यवस्थापन केल्यास निर्यातक्षम फळबाग तयार करणे शक्य होईल. असे प्रतिपादन राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.सोमनाथ पोखरे यांनी केले.

आज दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी सलगर बुद्रुक तालुका मंगळवेढा येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका कृषी अधिकारी कार्यालय मंगळवेढा मार्फत

निर्यातक्षम डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश श्रीखंडे, तालुका कृषी अधिकारी मंगळवेढा यांनी केले.

त्यानंतर तेलकट डाग नियंत्रण, कळीकुज, फळकुज, मररोग, शॉट होल बोअरर, खोडकिड,अशा विविध संकटांना मात देत मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी चांगल्या दर्जाची डाळिंबाची शेती करत आहेत. परंतु आताचा काळ एकट्या दुकट्याने शेती करण्याचा नसून गटाच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमालाची प्रतवारी, प्रक्रिया करणे व सर्वात महत्त्वाचे मार्केटिंग करणे अत्यंत गरजेचे आहे. असे प्रतिपादन मदन मुकणे, प्रकल्प संचालक, आत्मा, सोलापूर यांनी केले.

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर येथील निवृत्त शास्त्रज्ञ तथा पूर्व संचालक, डॉ. जोत्स्ना शर्मा यांनी तेलकट नियंत्रण, कळीकुज, फळकुज नियंत्रण, मर रोग त्याची लक्षणे व त्यावरील रासायनिक नियंत्रणाच्या औषधांचे प्रमाण व फवारणीचे वेळापत्रक याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विश्रांती काळामध्ये बागेची घ्यावयाची काळजी विषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र येथील शास्त्रज्ञ डॉ. मल्लिकार्जुन यांनी सांगितले की पिनहोल बोअरर ही किड डाळिंब बागेत पूर्वी मायनर पेस्ट म्हणून ओळखली जात होती. ती वातावरणातील बदलामुळे मेजर पेस्ट निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहे.

या पिनहोल बोअरर किडीच्या नियंत्रण बाबत सविस्तर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे शंकांचे निरसन केले. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र येथील शास्त्रज्ञ डॉ.चंद्रकांत अवचारे यांनी लागवड पद्धतीवर मार्गदर्शन केले. व लागवडीचे अंतर कसे असले पाहिजे. तसेच लागवड पद्धतीवर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, सरपंच सूर्यकांत धायगोंडे, माजी सरपंच तानाजी जाधव ,पांडुरंग कांबळे, संजय धायगोंडे, आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. सदर कार्यक्रम वेळी मंडळ कृषी अधिकारी, भागवत सरडे, राजेंद्र भांगे, बालाजी टेकाळे, नितीन रणदिवे तसेच कृषी पर्यवेक्षक, युवराज यादव व दीपक ऐवळे, कृषी सहाय्यक प्रशांत काटे, मंगेश लासुरकर, पांडुरंग चौधरी, किरण मलाबादी, गणेश भागवत, स्वप्नील बळछत्रे आणि बहुसंख्येने डाळींब उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

आत्माचे विक्रम सावजी, शैलेश पाटील आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रशांत काटे यांनी केले. व आभारप्रदर्शन राजेंद्र भांगे यांनी केले. त्यानंतर डाळींब उत्पादक शेतकरी संजय धायगोंडे यांच्या डाळींब बागेमध्ये उपस्थीत शेतकऱ्यांना कीड, रोग ओळख व नियंत्रण बाबत सर्व शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com