सोलापुरात एका दिवसात 12 हजार गॅस सिलिंडरचे वितरण 

सोलापुरात एका दिवसात 12 हजार गॅस सिलिंडरचे वितरण 
Updated on

सोलापूर  ः संचारबंदीच्या कालावधीत थांबविण्यात आलेले गॅस सिलिंडरचे वितरण मंगळवारी पुन्हा सुरु झाले. मंगळवारी एका दिवसांत शहरात सर्व मिळून सुमारे 12 हजार सिलिंडरचे वितरण झाल्याचे शहरातील विक्रेत्यांनी सांगितले. 

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. दूध, भाजीपाला, किराणा, औषधे या वस्तू जशा जीवनावश्‍यक आहेत तसेच गॅस सिलेंडरही अत्यावश्‍यकच आहे. मात्र संचारबंदीच्या कालावधीत प्रशासनाने गॅस सिलिंडरला अत्यावश्‍यक सेवेतून वगळले होते. त्यामुळे संचारबंदीच्या कालावधीत सिंलिंडरचे वितरण ठप्प झाले होते. या कालावधीत शहराच्या विविध वितरकांकडी प्रतिक्षा ग्राहकांची संख्या ही सुमारे 35 ते 40 हजारांवर गेली होती. दरम्यान सोमवारी मध्यरात्री संचारबंदी संपली आणि लॉकडाऊन सुरु झाला. त्यामुळे सिलिंडर वितरणाचे काम पुन्हा सुरु झाले. 

गॅस कंपन्या व त्यांचे वितरक सिलेंडर वितरणास तयार असतानाही जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेमुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती. संचारबंदीच्या कालावधीत दूध वगळता किराणा, भाजीपाला व गॅस पुरवठ्यावरही निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे अन्न शिजवणार कसे हा प्रश्‍न निर्माण झाला होता. सोलापूर शहरात भारत गॅस कंपनीचे 20, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे तीन , इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे दोन असे एकूण 25 वितरक आहेत. मात्र संचारबंदीच्या कालावधीत ही यंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडली होती. मंगळवारी लॉकडाऊनमध्ये गॅस सिलिंडर वितरणाला परवानगी असल्याने शहराच्या अनेक भागात सिलिंडरसाठी रांगा लागल्या होत्या. 

नियमित सिलिंडर पोच होईल
संचारबंदीमुळे गॅस सिलिंडरच्या वितरणात अडचणी आल्या होत्या. मंगळवारपासून नियमित वितरण सुरु झाले आहे. लवकरच प्रतीक्षा यादी संपेल व यापुढे ग्राहकांना नियमित सिलिंडर पोच होईल. 
- मनोज यलगुलवार, वितरक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmers in Mohol taluka face a severe drought-like situation as rainfall remains inadequate, affecting crops, water availability, fodder and dairy production.
Mohol Police conduct a route march across the city and Shetphal ahead of Ganeshotsav to maintain law and order.
Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Marathi News Esakal
www.esakal.com