
सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुमारे सहा वर्षांपासून निवडणूक प्रक्रिया झाली नाही. विना संचालक मंडळ बँकेचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे बॅंकेची निवडणूक प्रक्रिया राबविण्याबाबत सहकार प्रधिकरणने विचार करावा. बॅंकेच्या कामकाजासाठी प्रशासकीय कारभार ठेवावा की संचालक मंडळ नेमावे? या बाबत राज्य शासनाने शिफारस करावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.