Pandharpur: ६ जुलैला आषाढी; सोयीसुविधा, अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करा; जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या सूचना..
Solapur News : पालखी मार्ग व पालखी तळांवर शौचालय, हिरकणी कक्ष, चेजिंग रुमची संख्या वाढवावी. पिराच्या कुरोली येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामांबाबत तत्काळ प्रस्ताव सादर करावा. एस.टी महामंडाळाकडून तात्पुरते बसस्थानक उभारण्यात येतात.
District Collector Asiwad reviewing the final preparations ahead of Ashadhi celebrations on July 6.Sakal
पंढरपूर : येत्या ६ जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा आहे. या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे ३० जून तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे १ जुलै २०२५ रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे.