
मंगळवेढा : भाजप सरकारने राज्यात रोजगार, महिला विकास व सुरक्षा, शेतकरी हित लक्षात घेऊन अनेक योजनाच्या माध्यमातून लाभ दिला. राज्यात महायुती म्हणून सगळ्यात मोठा पक्ष भाजपच असून जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्ष म्हणून पूर्ण ताकदीने चिन्हावर लढवल्या जातील, असा ठाम विश्वास जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.