esakal | दिव्यांगाना पिवळी शिधापत्रिका मिळवून देणारच : आडम मास्तरांचा वज्रनिर्धार

बोलून बातमी शोधा

adam master.jpg

लाल बावटा कार्यालय येथे दिव्यांगाना महाराष्ट्र राज्य शासनाच्या 2014 दिव्यांलाल बावटा दिव्यांग श्रमिक संघटना (सिटू संलग्न) च्या वतीने सोमवारी (ता. 5 एप्रिल) दत्तनगाना शिधापत्रिका परिपत्रकानुसार पिवळी शिधापत्रिका मिळाली पाहिजे. ही मागणी घेऊन संघटनेचे अध्यक्ष बाबूलाल फनिबंद यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग श्रमिकांचा मेळावा पार पडला.

दिव्यांगाना पिवळी शिधापत्रिका मिळवून देणारच : आडम मास्तरांचा वज्रनिर्धार
sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूर ः दिव्यांग म्हणून जन्माला येणे पाप नाही, याला गरिबीचा शाप आहे. भारतातील कित्येक गर्भवतींना संतुलित व सकस आहार, आवश्‍यक औषधांचा अभाव, आवश्‍यकतेपेक्ष कमी झोप मिळणे, यामुळे जन्मला येणारे मुलं दिव्यांग होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. पण दिव्यांग हे समाजाचा अविभाज्य अंग असून त्यांना होणाऱ्या सामाजिक, शारीरिक, मानसिक त्रासातून मुक्त केले पाहिजे तसेच किमान दोन वेळचे जेवण, वैद्यकीय सवलत, पाल्यानं शैक्षणिक सवलत मिळावे या करिता हक्काची पिवळी शिधापत्रिका मिळवून देणारच असा वज्रनिर्धार ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी दिव्यांगाच्या मेळाव्यात केले. 
लाल बावटा कार्यालय येथे दिव्यांगाना महाराष्ट्र राज्य शासनाच्या 2014 दिव्यांलाल बावटा दिव्यांग श्रमिक संघटना (सिटू संलग्न) च्या वतीने सोमवारी (ता. 5 एप्रिल) दत्तनगाना शिधापत्रिका परिपत्रकानुसार पिवळी शिधापत्रिका मिळाली पाहिजे. ही मागणी घेऊन संघटनेचे अध्यक्ष बाबूलाल फनिबंद यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग श्रमिकांचा मेळावा पार पडला. यावेळी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचे महाराष्ट्र राज्य महासचिव ऍड. एम. एच. शेख यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, दिव्यांगाबाबत शासकीय कार्यालयात मिळणारी माणुसकीशून्य वागणूक, अधिकाऱ्यांचा त्रास हा अव्यक्त आहे. शासनाच्या अनेक योजना कागदावरच आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन आणि प्रशासन उदासीन असून याला संघर्षाशिवाय पर्याय नाही, असे मत व्यक्त केले. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नगरसेविका कामिनी आडम म्हणाल्या की, महानगरपालिकेत दिव्यांगाना उदरनिर्वाह भत्ता, दिव्यांग प्रमाणपत्र, लाभ मिळावे म्हणून सभागृहात आवाज उठवत असून आपल्या एकजुटीची गरज आहे. आपण लढ्यात या सरकारशी दोन हात करण्यास आम्ही तयार आहोत असे आश्वासन दिले. यावेळी व्यासपीठावर अकिल शेख, आसिफ पठाण, मुरलीधर सुंचू, अनिल वासम, इब्राहिम मुल्ला, प्रभाकर कलशेट्टी, सुशील गुजले, अमिना शेख, सुरेखा गडदे, सलीम शेतसंदी, सुनीता अंजिखाने, अशोक बल्ला, दत्ता चव्हाण आदींची उपस्थिती होती. या मेळाव्याचे प्रास्ताविक प्रा. इलियास सिद्दीकी यांनी केले. सूत्रसंचालन युवा महासंघाचे जिल्हा सचिव अनिल वासम यांनी केले.