विमानात आवाज आला, कुणी डॉक्‍टर आहे का इथं...? 

Doctor Sumit More treated the patient on the plane
Doctor Sumit More treated the patient on the plane
Updated on

सोलापूर : विमानातून प्रवास... सकाळची वेळ... तेवढ्यात अनाउसमेंट झाली, "कोण डॉक्‍टर आहे का? असल्यास त्वरित इमर्जन्सी केबिनकडे या.' हा आवाज ऐकताच डॉ. सुमीत मोरे झोपेतून उठले अन्‌ केबिनकडे गेले. रुग्णावर उपचार सुरू केले. कुटुंबालाही त्यांनी आधार दिला. मॉरिशसला जाताना हा प्रकार डॉ. मोरे यांच्याबाबत घडला. डॉक्‍टरांच्या या सतर्कतेमुळे विमानात अचानक त्रास सुरू झालेला परदेशी रुग्ण वेळीच उपचार झाल्याने सुखरूप मायदेशी परतला. 


सोलापुरातील सात रस्ता परिसरातील मनोरमा रुग्णालयाचे डॉ. सुमीत श्रीकांत मोरे हे 27 जानेवारीला विमानाने कुटुंबासह मॉरिशसला जात होते. त्यांना मुंबईतून सकाळी 6 वाजता विमान होते. विमान टेकअप झाले. दोन-तीन तासांचा प्रवास झाला. दरम्यान, डॉ. मोरे यांना झोप लागली. तेवढ्यात अनाउंसमेंट झाली, "कोणी डॉक्‍टर आहे का? असेल तर त्यांनी त्वरित इमर्जन्सी केबिनकडे या'. हा आवाज कानी पडताच डॉ. मोरे त्वरित उठले अन्‌ केबिनकडे गेले. एका आजींना अचानक त्रास होऊ लागला होता. इमर्जन्सी लॅंडिंगही त्यावेळी शक्‍य नव्हते. तेव्हा आहे या स्थितीत डॉ. मोरे यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. 70 वर्षांच्या या आजींना विमानातच डायबिटीजचा त्रास सुरू झाला होता. त्यांची शुगर लेव्हल अन्‌ दमही वाढला होता. अचानक त्रास झाल्याचे पाहून रुग्णाचे नातेवाईक घाबरले. कोणाला काय करावे काहीच सुचेना? तेवढ्यात सतर्कता दाखवून डॉ. मोरे यांनी रुग्णाच्या नातेवाइकांना आधार दिला. 
डॉ. मोरे म्हणाले, रुग्णाला त्रास जास्त होत होता. मात्र, इमर्जन्सी लॅंडिंगही शक्‍य नसल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे आहे त्या स्थितीत उपचार केले. काही वेळातच रुग्णाने उपचाराला प्रतिसाद देण्यास सुरवात केली. त्यानंतर विमान लॅंडिंग होताच त्यांना इमर्जन्सी मेडिकल टीमकडून उपचार देण्यास सांगितले. मॉरिशस एअर कंपनीनेही तशी व्यवस्था केली. 

मॉरिशस एअर कंपनीकडून आभार... 
डॉ. मोरे हे मॉरिशसमध्ये पोचल्यानंतर त्यांचा मोबाईल बंद पडला. त्यामुळे त्यांचा संपर्क तुटला. त्यामुळे एअर कंपनीला त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही. दरम्यान, त्यांचे रिटर्न तिकीट त्याच कंपनीचे होते. त्यावरून कंपनीने त्यांना संपर्क साधला. त्यांनी केलेल्या कामाबद्दल मॉरिशस एअर कंपनीने त्यांना मेल पाठवून त्यांचे आभार मानले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com