Tiger : वाघाच्या मागावर पुण्याचे डॉग स्क्वॉड : भूम तालुक्यात स्थलांतर; मुख्य वनसंरक्षकांकडून मोहिमेचा आढावा
Solapur News : वाशी (जि. धाराशिव) तालुक्यातील वडजी भागात मंगळवारी वाघाचे वास्तव्य होते. याच ठिकाणी रेस्क्यू पथक दाखल झाले. या पथकाने दिवसभरात वाघाचा मागोवा घेण्यासाठी काम सुरू केले. पुण्याच्या पथकासोबत डॉग स्क्वॉड देखील आहे.
Pune’s dog squad in action as they track a tiger in Bhivpur taluka, with the operation being reviewed by the chief conservator.sakal
सोलापूर : काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील वडजी भागातून वाघाने १५ किमी अंतर उत्तरेकडे म्हणजे भूम तालुक्याच्या दिशेने स्थलांतर केल्याचे पथकास आढळून आले. पुण्याच्या पथकासोबत आलेले डॉग स्क्वॉड वाघाच्या मागावर आहे.