
सोलापूर : रिक्षाची वाट बघत थांबलेल्या पत्नीला बाजूला बोलावून विनोद नामदेव सरवदे (रा. जोशी गल्ली, रविवार पेठ) याने तिच्या छातीत दोनदा चाकू खुपसून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो फरार झाला असून एमआयडीसी पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथक त्याचा शोध घेत आहे.