मागील वर्षीच्या माघी यात्रेत तीन कोटी ५९ लाख २२ हजार ५१९ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. गतवर्षी तुलनेत यंदा सुमारे ४७ लाखांनी घट झाली आहे.
पंढरपूर : माघ यात्रा कालावधीत भक्तांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी (Vitthal-Rukmini Temple) मातेच्या चरणी लाखो रुपयांचे दान केले. तसेच सोन्या चांदीचे दागिने (Gold and Silver Jewelry) अर्पण केले. यात्रा काळात सुमारे तीन कोटी तीन लाख रुपयांचे दान पेटीत जमा झाले आहेत. दरम्यान, मागील यात्रेच्या तुलनेत यंदा ४७ लाख रुपयांनी घट झाली आहे.