Solapur : शहर काँग्रेस युवकाध्यक्षपदी डोंगरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

praniti shinde

शहर काँग्रेस युवकाध्यक्षपदी डोंगरे

सोलापूर : शहर युवक काँग्रेस अध्यक्षपदासाठी १२ जण इच्छुक होते. त्यांनी १८ ते ३५ वयोगटातील सदस्य नोंदणी सुरु केली होती. १२ डिसेंबरपर्यंत त्यासाठी सदस्य नोंदणी अपेक्षित असतानाच आमदार प्रणिती शिंदे यांनी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे यांची निवड जाहीर केली.

राज्यभर युवक काँग्रेस निवडीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर इच्छुकांनी सदस्य नोंदणी केली. शहरातून गणेश डोंगरे, विवेक कन्ना, झिशान सय्यद, सचिन वेरणेकर, आकाश गायकवाड, राजासाब शेख, अर्जुन साळवे, प्रशांत कांबळे, पवन दोडमणी, सचिन मानवी, सुशीलकुमार म्हेत्रे व प्रतिक आबुटे यांनी निवडणुकीत सहभाग घेतला. त्यांनी १२ नोव्हेंबरपासून सदस्य नोंदणी सुरु केली. काहींनी स्वत:हून प्रत्येकी ५० रुपयांची नोंदणी फी भरून अनेकांना युवक काँग्रेसचे सदस्य करून घेतले. मात्र, ठरल्याप्रमाणे गणेश डोंगरे यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब झाले. अंबादास करगुळे यांनी जातीवर मतदान न होता काम करणाऱ्याला संधी मिळावी, अशी अपेक्षा त्यावेळी व्यक्‍त केली होती. मात्र, आमदार प्रणिती शिंदे यांच्या आदेशाने डोंगरे यांच्या निवडीला अनुमोदन दिले.

loading image
go to top