
सोलापूर : महापालिकेचे प्राणी संग्रहालयाच्या मान्यतेसाठी विविध विकासकामे करणे आवश्यक आहे. या कामांसाठी तब्बल १५ कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीकडे हा प्रस्ताव देण्यात येणार आहे. या कामांकरिता तातडीने निधी मिळण्यासाठी पालकमंत्र्यांकडे प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.