
सोलापूर : न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर हे मनाने कणखर होते. प्रशासकीय अधिकारी महिलेने ई मेल केला म्हणून आत्महत्या करतील इतके लेचेपेचेही ते नव्हते. त्यांच्या जवळच्याच एका नातेवाईककडून गेल्या दीड वर्षांपासून त्यांचे खच्चीकरण करण्यात येत होते. त्यांना पदोपदी अवमानित करण्यात येत होते. त्यांच्या शब्दाला त्यांच्या दवाखान्यात किंमत राहिली नव्हती. वयाने छोटी असलेली नातेवाईक व्यक्ती डॉ. शिरीष यांच्यावर तीन वेळा धावून गेली होती. एकदा गालावर xxx. हे सर्व ते सहन करत होते.