

Textile Trade Route Turns Crime Scene as ₹3 Crore Robbery Rocks Tembhurni
sakal
टेंभुर्णी: कर्नाटक राज्यातील चडचण (जि. विजयपूर) येथील साडी व्यापाऱ्याचा सेल्समन सुरत (गुजरात) येथे साड्या आणण्यासाठी टेम्पोने जात होता. त्या टेम्पोला स्विफ्ट कार आडवी लावून चौघांनी चाकूचा धाक दाखवत तीन कोटी रुपये लुटल्याची धक्कादायक घटना घडली. टेंभुर्णी–करमाळा रस्त्यावरील बंद पडलेल्या टोलनाक्याजवळ सोमवारी (ता. ११) मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मोडनिंब येथील दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे अन्य साथीदार फरार आहेत.