मंगळवेढ्याच्या दक्षिण भागात दुष्काळी स्थिती

शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी मारामार; दुष्काळ उपाय योजनेची नितांत गरज
Drought
DroughtSakal
Updated on

सलगर बुद्रुक - दक्षिण मंगळवेढ्यातील गावांमध्ये शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. विहिरीमध्ये डोकावून बघितलं तरी पाणी दिसत नाही. विंधन विहिरींचे पाणीही ७० टक्यापर्यंत कमी झालेले आहे. अशात अजून दोन महिने कसे जाणार याची चिंता या भागातील नागरिकांना सतावत आहे.

पाण्यासाठी भटकंती

दक्षिण मंगळवेढ्यातील विशेषतः गावात राहणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी व वापरासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी मैलोमेल भटकंती करावी लागत आहे. घरातील कर्त्या माणसाला रोजंदारीचे काम बुडवून पाणी भरण्यासाठी घरात थांबावे लागत आहे. भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद आहे. बऱ्याचश्या गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा स्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरवातीलाच पाणी समस्या जाणवू लागली आहे.

विकतच्या पाण्याचा पर्याय

सलगर बुद्रुकसारख्या गावामध्ये एका गावामध्ये पाच ते सहा खासगी टँकर धारकांकडून गावात राहणाऱ्या लोकांना पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी प्रति दोनशे लिटरच्या बेरेलला पन्नास रुपये मोजावे लागत आहेत. विकतचे पाणी घेण्याचा प्रकार एका महिन्यापासून सुरू आहे. अशातच महावितरणच्या भोंगळ कारभाराची भर पडत आहे. विजेच्या अनियमिततेमुळे विकतचे पाणीही वेळेवर मिळत नसल्याचे चित्र आहे.

बागायती क्षेत्र संकटात

पहिल्यांदा खराब वातावरणाचा फटका व आता दुष्काळाची झळ यामुळे या परिसरातील शेतकरी कोलमडून गेला आहे. काही शेतकरी टँकरने विकतचे पाणी देऊन शेतीची तहान भागवत आहेत. अधिकतम शेतकऱ्यांनी डाळिंब तसेच इतर फळबागांना निसर्गाच्या कृपेवर सोडले आहे. एकूणच परत एकदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

तालुक्याच्या दक्षिण भागात दुष्काळी परिस्थिचा विचार करून प्रशासनाने दुष्काळ जाहीर करावा. तसेच दुष्काळी उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणी या परिसरातील नागरिक करत आहेत. लोकप्रतिनिधींनी याची दखल घ्यावी व शासन दरबारी आवाज उठवून दुष्काळी उपाययोजना राबवून दुष्काळाची झळ कमी करून या परिसरातील नागरिकांना व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Congress spokesperson Hanumant Pawar criticizes BJP over Ram Mandir credit politics and 'Ladki Bahin' scheme policy
Marathi News Esakal
www.esakal.com