Maharashtra Drought: सोलापूर जिल्ह्यातील आणखी 46 मंडळामध्ये दुष्काळ जाहीर; कर्जवसुली थांबणार

Drought : जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत कमी पर्जन्यमान झाले असल्याचे आढळले.
drought report submit to collector agri farmer mohol will include in drought list
drought report submit to collector agri farmer mohol will include in drought listsakal
Updated on

राज्यातील 40 तालुक्यांमध्ये यापूर्वीच दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. आता राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील 1021 मंडळामध्येही दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील 46 महसूल मंडळांचा समावेश आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या आपतग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी राज्यातील 40 तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त राज्यातील इतर तालुक्यातील महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत कमी पर्जन्यमान झाले असल्याचे आढळले.

drought report submit to collector agri farmer mohol will include in drought list
Nashik Drought News: जिल्ह्यात अर्धा डझन तालुक्यांत यंदा दुष्काळाचे ‘दीप’; टंचाई आराखड्याला लागेना मुहूर्त

त्यानुसार मंत्रिमंडळ उपसमितीच्या ९ नोव्हेंबरच्या बैठकीमध्ये त्या महसूल मंडळांचा पण दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.तेथेही आता सवलती लागू असतिल. ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या ७५% पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मि.मि. पेक्षा कमी झाले आहे, अशा १०२१ महसुली मंडळांमधील शेतकर्‍यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

जिल्ह्यातील 'या' मंडळामध्ये दुष्काळ जाहीर

1) उत्तर सोलापूर : शेळगी ,तिऱ्हे, मार्डी वडाळा, सोलापूर.

2) दक्षिण सोलापूर : बोरामणी, वळसंग, मंद्रूप, होटगी, मुस्ती, निम्बर्गी, विंचूर.

3) अक्कलकोट : अक्कलकोट, जेऊर, तडवळ, करजनी, दुधनी, मैंदर्गी, वागदरी, चपळगाव, किणी.

4) मोहोळ : मोहोळ, कामती बु, टाकळी सिकंदर, पेनुर, वाघोली, नरखेड, सावळेश्वर, शेटफळ.

5) माढा : मोडनिंब

6) पंढरपूर : पंढरपूर, भंडीशेगाव, भाळवणी, करकंब, पटवर्धनकुरोली, पुळुज, चळे, तुंगत, कासेगाव.

7) मंगळवेढा : बोराळे, मरवडे, आंधळगाव, मारापुर, मंगळवेढा, भोसे, हुलजंती.

drought report submit to collector agri farmer mohol will include in drought list
Jalgaon Drought News: भडगाव, पाचोरा दुष्काळी जाहीर होणार; आमदार किशोर पाटील यांच्या मागणीला प्रतिसाद

'या' सवलती होणार लागू

१) जमीन महसूलात सूट.

२) पीक कर्जाचे पुनर्गठन.

३) शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती. ४) कृषी पंपाच्या चालू विजबिलात ३३.५% सूट.

५) शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परिक्षा शुल्कात माफी.

६) 'रोहयो'अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता.

७) आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्स.

८) टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे.

drought report submit to collector agri farmer mohol will include in drought list
Dhule Drought News : जिल्ह्यातील 28 महसूल मंडळांचा नव्याने दुष्काळात समावेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com