Drought News : पाऊस लांबल्याने पिकांनी टाकल्या माना ; शेतकरी संकटात !

Drought News : पिकाचा विमा भरला ते शेतकरी देखील सध्या चिंतेत
Drought News : पाऊस लांबल्याने पिकांनी टाकल्या माना ; शेतकरी संकटात !

Drought News : मंगळवढा तालुक्यात शासनाच्या खरीप हंगामात टंचाईच्या उपायोजना करण्यासाठी चालढकल केल्यामुळे तालुक्यातील खरीप पिकासह, चाऱ्यासाठी पशुधन संकटात सापडले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाचे डोळे कधी उघडणार असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे

दरवर्षी खरीप हंगामात वेळेवर पावसाला सुरुवात केल्यास तालुक्यामधील शेतकऱ्यांना खरीप पिके व जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होतो. परंतु यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप पिके संकटात सापडली.यंदा तालुक्यात 68 हजार शेतकऱ्यांनी 51 हजार हेक्टर वर बाजरी, तूर, मका,कांदा या पिकाचा विमा भरला ते शेतकरी देखील सध्या चिंतेत सापडले.

Drought News : पाऊस लांबल्याने पिकांनी टाकल्या माना ; शेतकरी संकटात !
Mumbai Local Train: कामावर निघालेल्या मुंबईकरांचा खोळंबा! हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड; लोकलची वाहतूक उशीराने

यंदाच्या खरीप हंगामात बाजरी 6,039,मका 7063, तुर 5102 ,मूग 298, उडीद 605, भुईमूग 987, सूर्यफूल 643, सोयाबीन 22 हेक्टरवर तर चारा पिकामध्ये खरीप मका, कडवळ, लसूण घास,नेपियर घास आदी पिकांची 1657.7 हेक्‍टरवर पेरणी झाली. परंतु पावसाने ओढ दिल्यामुळे सगळी पिके अडचणीत आली. नदीकाठ व कालवा क्षेत्र वगळता तालुक्यातील पूर्ण क्षेत्र हे खरीप पावसावर अवलंबून आहे.यंदा उजनी धरण पुरेसे न भरल्यामुळे भविष्यात त्या क्षेत्रातील पिकावरही परीणाम जाणवणार आहे.खरीपसाठी देखील पाणी सोडण्यास विलंब झाल्यामुळे ती पिके देखील अधिक अडचणीत आली.

Drought News : पाऊस लांबल्याने पिकांनी टाकल्या माना ; शेतकरी संकटात !
Baked Kanda Bhaji : कधी ऑईल फ्री कांदा भजी खाल्ली का? माधुरी दीक्षित सांगतेय 5 प्रकारच्या रेसिपीज

आ.समाधान आवताडे यांनी गाव भेट दौरा केल्यानंतर चारा डेपो व छावणी सुरू करण्याची मागणी आल्यावर पावसाळी अधिवेशनामध्ये चारा डेपो व चारा छावणी सुरू करण्याची मागणी केली परंतु प्रशासनाने दोन महिने पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याचा अहवाल दिल्यामुळे चारा डेपो व चारा छावणी सुरू होण्यास विलंब होणार आहे सध्या जनावरांना हिरवा चारा म्हणून उसाचा वापर केला जात आहे तो ऊस प्रति टन 4000 प्रमाणे विकत घेऊन पशुधन जगवताना शेतकरी देखील आर्थिक अडचणीत आलेले आहेत त्यामुळे दुधातून मिळणारे उत्पन्न चाऱ्यावरच खर्ची पडत आहेत. हिरव्या चाऱ्यासाठी उसाचा सर्वाधिक वापर केला जात असल्यामुळे यंदाच्या गळीत हंगामात साखर कारखानदारीवर याचा मोठा परिणाम जाणवणार आहे.सरकारी काम आणि सहा महिने थांब ही भूमिका शासनाची होवू लागल्यामुळे यामध्ये निर्णय घेण्यास विलंब होत असल्यामुळे सध्या शेतकरी पूर्ण अडचणीत सापडत आहे.

Drought News : पाऊस लांबल्याने पिकांनी टाकल्या माना ; शेतकरी संकटात !
Drought News : दुष्काकाळामुळे चाऱ्याचे भाव भडकले ; पशुधन सांभाळणे झाले अवघड

सध्या मारोळी,खडकी, भोसे,डोंगरगाव ,तळसंगी,लक्ष्मी दहीवडी आदी मध्यम प्रकल्प कोरडे आहेत तर म्हैसाळचे पाणी तलावात सोडण्याची मागणी करून देखील चालढकल करत कागदी घोडे नाचवले जात आहे. गतवर्षी खरीप हंगामात पिक विमा देताना विमा कंपनीने देखील सवतीची वागणूक देत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे वेळेत तक्रार करूनही पंचनामेच केले नाहीत तर शासकीय मदत दोनच महसूल मंडळाला भरपाई देऊन उर्वरित सहा मंडळ मधील शेतकरी वंचित ठेवले. सध्या शासनाच्या उदासीन धोरणाचा फटका देखील तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसू लागला.

Drought News : पाऊस लांबल्याने पिकांनी टाकल्या माना ; शेतकरी संकटात !
Snakes Farming : सापांची शेती करून हा पठ्ठ्या कमावतो कोट्यवधी रुपये! जाणून घ्या कशी करतात सापांची शेती

आठवड्याभरात तालुक्यात पाऊस न झाल्यास 3 हजार 205 हेक्टर पिकाला फटका बसू शकतो. तसा अहवाल शासनास कळविला आहे

गणेश श्रीखंडे, तालुका कृषी अधिकारी

पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप पिके व पशुधन संकटात आले असून कागदोपत्री उपाययोजना न दाखवता शासनाने तात्काळ चारा छावणी व डेपो सुरू करावे.अन्यथा येत्या काही दिवसात शेतकऱ्यासह रस्त्यावर उतरू

प्रशांत साळे, तालुकाध्यक्ष, काॅग्रेस

खरीप पावसावरील शेती पावसाने ओढ दिल्यामुळे अडचणीत आल्याने केलेला खर्च वाया गेला.गतवर्षी नुकसानीची कल्पना देऊन देखील विमा कंपनीने पंचनामे न केल्यामुळे नुकसान भरपाई मिळाली नाही. शासनाने तात्काळ मदतीचा दिलासा देणे गरजेचे आहे

महादेव कांबळे, शेतकरी, भाळवणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com