
मोहोळ - सीना नदीपात्रात कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यालगत अंघोळीसाठी गेलेल्या व पाण्याचा अंदाज न आल्याने, तसेच पोहता येत नसल्याने नदी पात्रातील पाण्यात बुडून दोन परप्रांतीय तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना बोपले, ता. मोहोळ येथे बुधवार ता. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. शंकर जीवनलाल बिरणवार (वय-19, हट्टा, रा. पाथरी किरणापुर, जि. बालाघाट, मध्यप्रदेश) सत्यम मिताराम गईगई (वय-15 हट्टा, रा. पाथरी किरणापुर, जि. बालाघाट, मध्यप्रदेश) अशी पाण्यात बुडून मरण पावलेल्या तरुणांची नावे आहेत.