ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची कारवाई ठप्प ; कोरोनामुळे मशीनमध्ये फुंकणे धोकादायक

कोरोनामुळे मशीनमध्ये फुंकणे धोकादायक; नियम उल्लंघनात वाढ
Drink and drive
Drink and drive sakal

सोलापूर : मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई केली जाते. परंतु, कोरोनामुळे त्या ब्रिथ ॲनालायझर मशीनमध्ये फुंकणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे मद्यपींवरील कारवाई थांबविण्यात आली आहे.रस्त्याच्या विरुध्द दिशेने वाहन चालविणे, ट्रिपल सीट दुचाकी चालविणे, अतिवेगाने वाहन चालविणे, सीटबेल्ट न लावता गाडी चालविणे, हेल्मेट नाही, मद्यपान करून वाहन चालविणे, वाहनाचा विमा व पीयुसी नाही, परवाना नसताना अथवा अल्पवयीन असताना वाहन चालविणे अशा प्रमुख मुद्यांवर बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते.

Drink and drive
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली

परिवहन आयुक्‍तालयाच्या नवीन आदेशानुसार दंडाची रक्‍कम वाढविण्यात आली आहे. दरवर्षी राज्यात ३० हजारांहून अधिक जणांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. सर्वाधिक अपघात होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सोलापूरही टॉपटेनमध्ये आहे. विशेष मोहिमेअंतर्गत बेशिस्त वाहनालकांविरुध्द कारवाई केली जाते.

११६ जणांचा परवाना होणार निलंबित

मोबाइलवर बोलत वाहन चालविणे, ट्रिपल सीट आणि विरुध्द दिशेने वाहन चालविणाऱ्या ११६ जणांचा वाहन परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव शहर वाहतूक शाखेने आरटीओला पाठविला आहे. दरम्यान, बेशिस्त वाहनचालकांवर सातत्याने कारवाई सुरू असतानाही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे आता बेशिस्त रिक्षांवर टार्गेट केले जाणार आहे.

Drink and drive
राज्यात कोरोना मृतांचा आलेख वाढला; दिवसभरात १८०६७ नव्या रुग्णांची भर

नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात शहर वाहतूक पोलिसांनी सात हजार ५३७ बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून तीन लाख ७५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामध्ये मोबाइल टॉकिंगसंदर्भातील १७३, ट्रिपल सीट दुचाकी चालविणाऱ्या १७५ जणांचा समावेश आहे. तसेच रस्त्याच्या विरुध्द दिशेने वाहन चालविणाऱ्या एक हजार १२९ जणांवरही दंडाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, शहरात जवळपास १४ हजारांवर रिक्षा असून त्यातून प्रवासी वाहतूक केली जाते. बहुतेक रिक्षाचालक मोठ्या आवाजात गाणी लावून प्रवासी वाहतूक करतात. त्यासंदर्भात काही तक्रारी शहर वाहतूक शाखेकडे प्राप्त झाल्या आहेत. तसेच प्रवासी दिसेल त्या ठिकाणी अचानकपणे रिक्षा थांबवली जाते. त्यामुळे अनेकदा अपघाताचीही शक्‍यता निर्माण होते आणि रहदारीस अडथळा निर्माण होतो. या पार्श्‍वभूमीवर तशा रिक्षांवर कारवाई केली जाणार आहे.

शहरातील अपघात व अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने बेशिस्त वाहनचालकांविरुध्द कारवाई केली जात आहे. दंडात्मक कारवाई करूनही बेशिस्तपणा कमी झाला नसल्याने पुन्हा एकदा कारवाईची मोहीम सुरु केली जाणार आहे. कोरोनामुळे ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची कारवाई बंद करण्यात आली आहे.

- दीपक आर्वे, सहायक पोलिस आयुक्‍त, शहर वाहतूक शाखा, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com