हैदराबाद, मुंबईतून सुकामेवा सोलापूरात दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुका मेवा | Dry fruits

हैदराबाद, मुंबईतून सुकामेवा सोलापूरात दाखल

सोलापूर : रमजान ईदनिमित्त शहरातील मीना बाजारमध्ये मुंबई, हैदराबाद व पुणे येथून सुकामेवा विक्रीसाठी दाखल झाला आहे. यामुळे बाजारपेठ सजली आहे. ईद दिवशी केल्या जाणाऱ्या शिरखुर्म्यासाठी लागणारे सुकामेव्याचे साहित्य विक्रीसाठी आले आहे. साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मीना बाजारमध्ये मोठी गर्दी होताना दिसून येत आहे.

मीना बाजार हा मागील ६० ते ७० वर्षांपासून विजापूर वेस येथे भरविला जातो. या ठिकाणी शहर, जिल्ह्यातील व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिक खरेदी करण्यासाठी येत असतात. या ठिकाणी विविध प्रकारचे साहित्य

विक्रीसाठी दाखल झाले आहेत. यामध्ये कपडे, चप्पल, बूट, दागिने, रुमाल, टोपी, अत्तर यांसह सुकामेवा आणण्यात आला आहे. शिरखुर्मा बनविण्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये शेवया, काजू, बदाम, पिस्ता, टरबूज बी, खोबरे या साहित्यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षांत मीना बाजार भरविण्यात आला नसल्याने यंदाच्या वर्षी सर्वांनाच मीना बाजाराबाबत उत्सुकता असून, खरेदीसाठी महिला, तरुण व तरुणींची गर्दी होताना दिसत आहे. सुकामेव्याचे दरदेखील वाढले असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या शेवयामध्ये एकूण पाच प्रकार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याचे दर १४० रुपये १५० रुपये किलो असे असून, यात फेणी, शेवया आदी प्रकार आले आहेत. दर जरी वाढले असले तरी ग्राहकांनी मीना बाजार परिसर फुलून गेला आहे.

तब्बल दोन वर्षांनंतर मीना बाजार भरला आहे. सुका मेव्याचे भाव वाढले असले तरी खरेदी करण्यासाठी रमजान ईदपूर्वीच ग्राहकांची गर्दी होत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत आणखीन यामध्ये वाढ होणार आहे.

- सिद्दकी डोक, व्यापारी

पेट्रोल- डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. साहजिकच याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. त्यामुळे सोका मेव्याचे दर वाढले आहेत. दर वाढले असले तरी ग्राहकांचा साहित्य खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बदाम व पिस्त्याचे दर सर्वाधिक

सुकामेव्यातील सर्व साहित्यामध्ये पिस्ता आणि बदामचे दर सर्वाधिक आहेत. पिस्ता १८०० रुपये किलो तर बदाम ९०० रुपये किलो आहे. जवळपास शंभर ते दोनशे रुपये किलोचा दर पिस्ता आणि बदाममध्ये वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

असे आहेत साहित्याचे दर (किलोमध्ये)

काजू -

९००-१०००

बदाम -

८००-९००

चारोळी -

१५००-१६००

टरबूज बी -

३६०

किसमिस -

३२०

खोबरे -

२२०

अक्रोड -

१०००-१२००

Web Title: Dry Fruits Hyderabad Mumbai Solapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top