esakal | जिल्ह्यातील 87 हजार 98 रुग्ण झाले बरे ! आज 1719 वाढले; 42 रुग्णांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

Corona

जिल्ह्यातील 87 हजार 98 रुग्ण झाले बरे ! आज 1719 वाढले; 42 रुग्णांचा मृत्यू

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : आतापर्यंत शहर-जिल्ह्यातील 87 हजार 98 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 72 हजार 200 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, दोन हजार 491 रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या शहरातील तीन हजार 640 तर ग्रामीणमधील आठ हजार 767 रूग्ण विविध रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. आज कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील उच्चांकी रूग्णांची व मृत्यूची नोंद जिल्ह्यात झाली. एक हजार 719 रूग्ण वाढले असून तब्बल 42 जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील दोन लाख 65 हजार 209 संशयितांची कोरोना टेस्ट आतापर्यंत पूर्ण झाली आहे. त्यात 23 हजार 397 जण पॉझिटिव्ह आले असून त्यातील एक हजार दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आज शहरातील 23 रूग्णांचा मृत्यू झाला असून 417 नव्या रूग्णांची वाढ झाली आहे. तर ग्रामीणमध्ये एक हजार 302 नवे रूग्ण वाढले असून 19 रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. शहर-जिल्ह्यातील एक हजार 119 रूग्ण आज कोरोनावर मात करीत घरी सोडले आहेत. ग्रामीण भागातील सात लाख 75 हजार 447 संशयितांमध्ये आतापर्यंत 63 हजार 701 जण पॉझिटिव्ह आले असून त्यातील एक हजार 489 जणांचा मृत्यू झाला आहे.

मागील काही दिवसांपासून मृत्यू वाढले असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. आज अक्‍कलकोट तालुक्‍यात 26 (4), बार्शीत 145, करमाळ्यात 119 (3), माढ्यात 139 (2), माळशिरस तालुक्‍यात 244 (1), मंगळवेढ्यात 66 (2), मोहोळमध्ये 109, उत्तर सोलापूरमध्ये 40 (3), पंढरपूर तालुक्‍यात 309 (2), सांगोल्यात 53 तर दक्षिण सोलापूर तालुक्‍यात 52 रूग्ण सापडले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये विलंबाने उपचारासाठी दाखल झालेल्यांचा समावेश आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, उपचारासाठी उशीर करू नये, असे आवाहन महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. बिरूदेव दुधभाते यांनी केले आहे.

जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती

  • एकूण टेस्ट : 10,43,656

  • पॉझिटिव्ह रूग्ण : 87,098

  • आतापर्यंत मृत्यू : 2,491

  • बरे झालेले रूग्ण : 72,200

  • उपचार घेणारे रूग्ण : 12,407