जिल्ह्यातील 15 गावांना मिळेना सरपंच ! कोरोनाच्या संकटात गाव कारभाऱ्याची उणीव

फेर आरक्षण न झाल्याने जिल्ह्यातील 15 गावांना सरपंच नाहीत
Sarpanch
SarpanchCanva

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश गाव कोरोनाच्या (Covid-19) संकटासोबत दोन हात करत आहेत. गाव पातळीवरील निर्णय घेण्यासाठी सदस्य आहेत परंतु सरपंच (Sarpanch) नाहीत, अशी स्थिती सोलापूर जिल्ह्यातील 15 गावांमध्ये निर्माण झाली आहे. गाव कारभाऱ्याशिवाय गावातील कोरोनाची लढाई ही गावे लढत आहेत. (Due to non-reservation, 15 villages in the district do not have Sarpanch)

Sarpanch
अकरावी प्रवेशासाठी सीईटी ! शिक्षण विभागातर्फे स्वतंत्र समिती

सोलापूर जिल्ह्यातील साडेसहाशे ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले व 18 जानेवारीला या निवडणुकीचा निकाल लागला. सरपंच आरक्षण सोडतीत या 15 गावांचे सरपंच आरक्षण झाले खरे; परंतु गावात ज्या प्रवर्गाचा सदस्यच नाही ते सरपंच आरक्षण मिळाले. 15 गावांमध्ये सरपंच पदाच्या आरक्षणाचा उमेदवारच नसल्याने या 15 गावांची सरपंच निवड रखडली आहे. गावात सरपंच पदाच्या आरक्षणाचा सदस्य नसल्यास त्या गावचे फेर आरक्षण काढण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. सरपंच निवडीच्या सभेनंतर तीस दिवसांमध्ये फेर आरक्षण काढावे, असा नियम आहे.

Sarpanch
तरुण ठरताहेत कोरोनाचे बळी ! 17120 रुग्णांवर सुरू आहेत उपचार

फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद झाले. कोरोनाला रोखण्यासाठी कडक निर्बंध आणि लॉकडाउन जाहीर झाला. त्यामुळे या 15 गावांच्या सरपंच पदाची फेर आरक्षण प्रक्रिया रखडली आहे. माळशिरस पंचायत समितीच्या उपसभापती निवडीची प्रक्रिया होऊ शकते मग या 15 गावाची फेर आरक्षण प्रक्रिया का होऊ शकत नाही, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

फेआरक्षणाच्या प्रतीक्षेत असलेली 15 गावे सांगोला तालुक्‍यातील आगलावेवाडी, बुरंगेवाडी, बोपसेवाडी, खिलारवाडी, निजामपुर, हनमंतगाव, तरंगेवाडी, बार्शी तालुक्‍यातील जहानपूर, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील खेड, मोहोळ तालुक्‍यातील बोपले, पंढरपूर तालुक्‍यातील शेंडगेवाडी, मंगळवेढा तालुक्‍यातील गणेशवाडी, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील राजूर व टाकळी आणि माळशिरस तालुक्‍यातील येळीव ही पंधरा गावे सरपंच पदाच्या फेर आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत.

या विषयासंदर्भातील फाईल माझ्याकडे आली आहे. या गावांमधील कोरोनाची स्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. लॉकडाउन असल्याने हा विषय प्रलंबित राहिला आहे.

- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com