जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये 13878 बेड शिल्लक ! ऑक्‍सिजनची घटली मागणी

कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये तेराशे बड शिल्लक आहेत
Corona Hospital Bed
Corona Hospital Bedesakal
Updated on
Summary

रुग्णांची संख्या कमी झाल्याने सध्या रुग्णांसाठी दररोज 45 टनापर्यंत ऑक्‍सिजन लागत आहे. सहा टनाने मागणी घटली आहे.

)सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेत शहर- जिल्ह्यात 59 हजार 471 रुग्ण आढळले तर एक हजार 320 रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयांमध्ये बेड मिळत नव्हते आणि बेड मिळाला तरी ऑक्‍सिजन (Oxygen), व्हेंटिलेटर (Ventilator) नव्हता, अशी परिस्थिती अनुभवायला मिळाली. मात्र, आता परिस्थिती सुधारत आहे. शहर- जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये 13 हजार 878 बेड्‌स शिल्लक असून, ऑक्‍सिजन व रेमडेसिव्हिरची (Remdesivir) मागणीदेखील घटल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे (Resident Deputy Collector Bharat Waghmare) यांनी दिली. (Due to the decline in the number of corona patients, there are thirteen hundred beds left in the hospitals in the district)

Corona Hospital Bed
छंद बनला उत्पन्नाचे साधन! शेटफळ येथील महिलेकडे दुर्मिळ वृक्षांचा संग्रह

शहरातील जवळपास 54 तर ग्रामीणमधील 67 रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांवर उपचार केले जातात. त्या ठिकाणी 26 हजार 912 बेड्‌स असून त्यात आयसीयू, व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन व साध्या बेड्‌सचा समावेश आहे. कोरोनाची दुसरी लाट गडद होत असतानाच राज्य सरकारने लागू केलेल्या लॉकडाउन काळात (22 एप्रिल ते 23 मे) शहरात चार हजार 899 रुग्ण वाढले तर त्यातील 367 रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात तब्बल 54 हजार 842 रुग्ण वाढले. त्यातील 953 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा व महापालिका प्रशासनाने रुग्णांच्या उपचारासाठी तात्पुरत्या स्वरूपात कोव्हिड केअर सेंटर, कोव्हिड हॉस्पिटलची सुरवात केली. शहरातील रुग्णसंख्या कमी झाल्याने केवळ एक कोव्हिड केअर सेंटर सुरू ठेवण्यात आले आहे. तसेच एक क्‍वारंटाईन सेंटर सुरू ठेवण्यात आले असून उर्वरित सर्व कोव्हिड केअर सेंटर व क्‍वारंटाईन सेंटर बंद करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील रुग्णसंख्याही आता कमी होऊ लागली असल्याने बेड्‌स शिल्लक राहत असल्याचेही निवासी उपजिल्हाधिकारी वाघमारे यांनी सांगितले.

Corona Hospital Bed
सर्वांत तरुण सरपंचाची कमाल ! पंचसूत्रीद्वारे गाव कोरोनामुक्त

रुग्णालयातील बेड्‌सची सद्य:स्थिती : एकूण बेड व कंसात शिल्लक बेड

  • आयसीयू : 1198 (189)

  • व्हेंटिलेटर : 329 (52)

  • ऑक्‍सिजन : 2973 (685)

  • साधे : 22,412 (12,952)

  • एकूण : 26,912 (13,878)

ऑक्‍सिजनची मागणी सहा टनाने घटली

जिल्ह्यातील ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या 22 हजारांवर पोचल्यानंतर रुग्णांसाठी तब्बल 51 टनापर्यंत ऑक्‍सिजनची मागणी वाढली होती. आता रुग्णांची संख्या कमी झाल्याने सध्या रुग्णांसाठी दररोज 45 टनापर्यंत ऑक्‍सिजन लागत आहे. सहा टनाने मागणी घटली असून रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनही शिल्लक असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिली. कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली असून शहरातील रुग्णसंख्या दोनअंकी झाली आहे. ग्रामीणमधील रुग्णसंख्या दररोज सहाशे ते सातशेने कमी होत आहे. आता मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mohol Police
Floating Solar Power Project Planned At Solapur Hipparga Lake To Generate Electricity Worth Rs 1 Crore Every Year
solapur city police
solapur
Marathi News Esakal
www.esakal.com