व्हेंटलेटरवर असलेल्या शेतकऱ्यांना मदतरुपी ऑक्‍सिजनची गरज

व्हेंटलेटरवर असलेल्या शेतकऱ्यांना मदतरुपी ऑक्‍सिजनची गरज
मळेगाव
मळेगावesakal
Updated on
Summary

मुसळधार पावसाने उभ्या पिकात गुडघाभर पाणी साचले असून बळीराजाच्या स्वप्नाचा चिखल झाला आहे. हा निसर्गाचा रुद्र अवतार पाहून शेतकरी मात्र धास्तावला आहे.

मळेगाव (सोलापूर): हिंगणी धरण क्षेत्र व ढाळे पिंपळगाव धरणक्षेत्र परिसरात रविवार व सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे भोगावती नदी व नीलकंठ नदीला तिसऱ्यांदा पूर आला आहे. विजेचा कडकडाटासह व वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने उभ्या पिकात गुडघाभर पाणी साचले असून बळीराजाच्या स्वप्नाचा चिखल झाला आहे. हा निसर्गाचा रुद्र अवतार पाहून शेतकरी मात्र धास्तावला आहे. त्यामुळे व्हेंटिलेटरवर असलेल्या जगाच्या पोशिंद्याला पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी भरीव आर्थिक मदतीची व आधाराची गरज आहे.

मळेगाव
अवकाळीसोबतच्या लढाईत बळिराजा हतबल ! मळेगाव परिसरात द्राक्ष, ज्वारी, हरभरा, गहू, कांद्याचे प्रचंड नुकसान 

कोरोनाचे संकट, पडलेले शेतमालाचे भाव, वाढती महागाई, कुटूंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यात भर पडली अतिवृष्टीरुपी आस्मानी व सुलतानी संकटाची. मळेगाव, उपळे, गौडगाव, ढाळे पिंपळगाव, हिंगणी परिसरात मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे सोयाबीन, उडीद, कांदा, मका, ऊस, तूर व इतर पिकांचे मोठं नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पोकळ आश्वासने न देता हेक्‍टरी पन्नास हजारांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांचे आश्रू पुसावेत, आशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

मळेगाव
आदर्श गाव ! सलग 45 वर्षे ग्रामपंचायत निवडणूक नाही; मळेगाव ठरतंय राज्यातील रोल मॉडेल 

- रविवारी व सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीत माझा दोन एकर ऊस भुईसपाट झाला आहे.तसेच सततच्या पावसामुळे सोयाबीन काळे पडले असून नव्याने कोंब फुटू लागले आहेत.प्रशासनाने सरसकट मदत करून शेतकऱ्यांना आधार द्यावा-

- बळीराम काशीद, शेतकरी, पिंपरी (सा)

बार्शी तालुका मंडळ निहाय दिनांक 5.10.2021 रोजीचा पाऊस मि.मि.मध्ये-

- बार्शी- 30,अगळगाव-10

- वैराग-45,पानगाव-53

- सुर्डी- 48,गौडगाव- 24,

- पांगरी-11,नारी-8.0,उपळे (दु.)- 27,खांडवी- 55

- एकुण पाऊस - 271 मि. मि.

- सरासरी पाऊस - 27.1 मि.मि.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

6,000 Litres of Fuel a Year! Know the Official Facilities for Solapur ZP President
Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Marathi News Esakal
www.esakal.com