
E-Peek Pahani : चार वर्षांपूर्वी राज्यात शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्याची नोंद तलाठ्यामार्फत केली जात होती. प्रत्यक्ष शेतात न जाता शेतकरी जे पीक सांगेल त्याची नोंद केली जात होती. त्यामुळे नुकसान भरपाईवेळी शेतकऱ्यांसह प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तर अनेक शेतकऱ्यांच्या पिकाच्या नोंद नसतानाही मदत लाटली जात असल्याने सरकारचीही फसवणूक होत होती.
शिवाय पिकांच्या पेरणी क्षेत्राची नेमकी आकडेवारी नसल्याने प्रशासन व सरकारी स्तरावर नियोजन करता येत नव्हते. फसव्या आकडेवारीवर आधारित नियोजनही कोलमडून पडायचे. त्यामुळे शेतकऱ्याने पेरलेल्या पिकाची अचूनक नोंद सरकार दफ्तरी व्हावी, यासाठी पीक पाहणी ॲप सुरू केले आहे. ते शेतकऱ्यांसाठीही लाभदायी असून सरकारची फसवणूकही टळत आहे.
प्ले स्टोअरमधून ई - पीक पाहणी ॲप डाऊनलोड करा.
डावीकडे दोन वेळा स्क्रोल केल्यानंतर निवडा या पर्यायाच्या ठिकाणी पुणे विभाग निवडा.
शेतकरी म्हणून लॉगइन केल्यानंतर वरीलप्रमाणे पर्याय दिसतील.
गट क्रमांक टाकल्यावर शेतकऱ्याचे नाव समोर येईल. खाते क्रमांक तपासून आपला मोबाईल क्रमांक टाका. एसएमएसद्वारे चार अंकी पासवर्ड येईल, तो काय लक्षात ठेवा.
त्यानंतर होम पेजवर येऊन पिकाची माहितीसाठी हा फॉर्म भरता येईल. त्यानंतर कॅमेरा पर्याय येईल, त्याद्वारे फोटो काढून फॉर्म सबमिट करा.
बांधावरील झाडांची माहिती नोंदविण्यासाठी असे पर्याय उपलब्ध आहेत.
माहिती भरून सबमिट केल्यानंतर अॅपवरच असा संदेश येईल.
शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद
दुष्काळ, अतिवृष्टीनंतर नुकसानीपोटी विमा, भरपाईची योग्य नुकसानग्रस्ताला लाभ मिळेल.
ना शेतकऱ्यांचे नुकसान, ना प्रशासनाची अडचण, ना सरकारची फसवणूक
राज्यासह देशात कोणत्या पिकाचा किती पेरा झाला याची अचूक आकडेवारी एका क्लिकवर उपलब्ध.
पिकाच्या अचूक आकडेवारीमुळे उत्पादनाबाबत अंदाज बांधणे सुलभ होईल.
बियाणे, खते उपलब्ध करुन देण्याबाबत सरकारला योग्य नियोजन करता येईल.
छायाचित्रासह अक्षांश, रेखांशामुळे कोणत्या भागात कोणत्या पिकाचे व किती पेरा झाला आहे, हेही समजेल.
एका मोबाईलवर २० शेतकऱ्यांच्या नोंदी करता येईल. मोबाईल नसल्याने होणारी अडचण येणार नाही.
यावर्षी पावसाने लवकर सुरवात केली आहे. यामुळे खरिपाचे क्षेत्र वाढणार असून शेतकरी कडधान्याबरोबरच कांदा पिकाकडे वळला आहे. सध्या कांद्याचे दर स्थिर असून येणाऱ्या काळात कांद्याच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे.
खरीप कांद्यासोबतच सरकारने निर्यात बंदी मागे घेतल्यास रब्बी कांदा ही शेतकऱ्यांना चार पैसे मिळवून देण्याची शक्यता आहे. यासोबतच मका उत्पादक शेतकऱ्यांनाही यावर्षी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र सर्व शेतीमालाचा निर्णय सरकारच्या हातात असून आयात निर्यात धोरण राबवताना सरकारने शेतकरी व जनतेच्या हितामध्ये समतोल राखल्यास परिस्थिती सामान्य राहील.
- संग्राम दास, यादव पाटील ॲग्रो, सोलापूर
खरीप शेतीमालाचा बाजार सर्वस्वी पावसाच्या भरोशावर अवलंबून आहे. सध्याची परिस्थिती पाहता यावर्षी अतिरिक्त पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच शेतीमालाचे दर चांगले राहण्याची अपेक्षा आहे.
यामध्ये मूग व उडीद याचे दर तेजीत राहतील, तुरीचा पेरा वाढल्यामुळे दराची परिस्थिती ही येणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून राहील. सरकारने कांद्याच्या बाबतीत हस्तक्षेप करताना दोन्ही बाजूचा विचार केल्यास यावर्षी कांदा उत्पादन शेतकऱ्याला घामाचा दाम मिळवून देण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी उजनी धरण वजा पातळीत असल्यामुळे जिल्ह्यात पेरणी क्षेत्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.
- संजय वाघचौरे, फताटे ॲग्रो, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.