

मंगळवेढा - शाळेच्या पहिल्या दिवसासाठी तालुक्यातील अनेक शाळा,विद्यार्थी, शिक्षक,आणि पालक स्वागतासाठी सज्ज असताना सिमावर्ती भागात असलेल्या लवंगी येथील शाळेत शिक्षक नसल्यामुळे पालकांनी पहिल्या दिवशी शाळेला कुलूप ठोकून शिक्षण खात्याच्या गलथान कारभाराचे स्वागत केले.
एकिकडे शाळा सुरु होण्यापुर्वीची लगबग चालु असतांना लवंगी येथे वेगळचं चित्र पाहायला मिळत. पाणी प्रश्नाची झळ राष्ट्रीय पातळीवर नेलेल्या तालुक्यातील लवंगी येथे पहिली ते चौथी या वर्गासाठी चार शिक्षक आहेत.
प्रत्यक्षात मात्र हे शिक्षक कार्यरत नसल्यामुळे इथल्या स्थानिक पालकांना स्थानिक स्वयंसेवकाची मदत घ्यावी लागत आहे. त्यांना पदरमोड करून दरमहा प्रत्येकी पाच हजार रुपये मानधन दिले जाते, परंतु यंदा नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये एकही शिक्षक दिला असल्यामुळे पहिल्या दिवशी पालकांनी शाळेला कुलूप ठोकून या नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत केले आहे. (Latest Marathi News)
सीमा वर्ती भागात असल्यामुळे तालुक्यातील अनेक प्राथमिक शिक्षकांनी तालुक्याच्या जवळची शाळा निवडल्यामुळे, सीमा वर्ती भागातील शिक्षकाची नोकरी करण्यासाठी अनेक शिक्षकांची मानसिकता होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा शैक्षणिक खेळ खंडोबा होत आहे.
तालुक्यामध्ये शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत परंतु या रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाने कसल्याच प्रकारची धास्ती घेतली नाही.
त्यामुळे तालुक्याच्या सिमावर्ती भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात अंधार निर्माण झाला आहे. त्यामुळे आज पहिल्याच दिवशी पालकांनी शाळेला कुलूप टाकून शाळेत स्थान मांडले आहे. (Marathi Tajya Batmya)
दोन शिक्षक व दोन स्वयंसेवक लवंगी शाळेत असून एका शिक्षणाबद्दल स्थानिक तक्रार आहे,सोमवार पर्यत आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकातून नवीन शिक्षक तालुक्याला मिळणार आहेत. त्यावेळी त्यांना शिक्षक उपलब्ध करून देऊ
- पोपटराव लवटे,प्र.गटशिक्षणाधिकारी
विद्यार्थी पटप्रमाणे या शाळेला गेली दोन वर्षापासून शिक्षक दिलेले नाहीत. आम्ही खिशातील पैसे घालून पालकांनी लोकसभागातून खाजगी नियुक्त शिक्षकांचे मानधन दिले.
शासन शिक्षणावर कोट्यावधी रुपये खर्च करत असताना सीमावर्ती भागात शिक्षक देत नसल्याने आम्ही शाळेला कुलूप लावले आहे,सोमवारी शिक्षक देण्याचे आश्वासन असले तरी शिक्षक जो पर्यंत दिले जात नाही तोपर्यंत शाळा उघडली जाणार नाही
जयसिंग जाधव, पालक लवंगी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.