दोन वर्ष रिकामे राहिलेले ईदगाह मैदान गर्दीने फुलले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eidgah Maidan Mangalwedha

यंदा अक्षय तृतीया रमजान ईद बसवेश्वर जयंती व परशुराम जयंती असे तीन वेगवेगळे धार्मिक उत्सव एकत्रित आल्यामुळे नागरिकांची एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी पळापळ दिसून आली.

दोन वर्ष रिकामे राहिलेले ईदगाह मैदान गर्दीने फुलले

मंगळवेढा - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे घरात साजरी करावी लागणारी रमजान ईद यंदा कडक उन्हाळ्यात केलेल्या रोजाच्या समाप्तीनंतर यंदा खुल्या वातावरणात मंगळवेढेकराने उत्साहात साजरी करण्यात आली.

यंदा अक्षय तृतीया रमजान ईद बसवेश्वर जयंती व परशुराम जयंती असे तीन वेगवेगळे धार्मिक उत्सव एकत्रित आल्यामुळे नागरिकांची एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी पळापळ दिसून आली. गेली दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवल्यामुळे शासनाच्या नियमाचे पालन करत नमाज पठाण घरी करावे लागले. उत्साहात साजरी कराव्या लागणाऱ्या ईदच्या सणाला कोरोनामुळे मुरड घालावी लागली. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने घातलेले निर्बंध शिथिल केल्यामुळे नागरिक सण साजरा करण्यासाठी उत्साहाने घराबाहेर पडले. त्यामुळे सणासाठी आवश्यक असणारे कपडे व इतर साहित्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आले. ऐन कडक उन्हाळ्यात आलेल्या रमजानच्या 30 दिवसांच्या कडकडीत रोजाच्या समाप्तीनंतर मंगळवेढा ते सांगोला रस्त्यावरील औरंगजेबकालीन ईदगाह मैदानावरील नमाज पठणाची 400 पेक्षा अधिक वर्षांची परंपरा गेली दोन वर्षे खंडित झाली. मात्र, यंदा मैदान गर्दीने फुलले. गर्दीमुळे मंगळवेढ्यातील इदगाह मैदानावर तीन वेळा नमाज अदा करण्यात आली.

शहरातील विविध प्रभागांत असलेल्या मशिदी व ईदगाह मैदानावर रमजान महिन्याच्या समाप्तीचे नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधव दरवर्षी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. तालुक्‍यात खासगी दुध संकलन केंद्रातून दुधाची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. दोन दिवस बाजारपेठेत सायंकाळच्या दरम्यान रमजान खरेदीला गर्दी जाणवली. शहर व ग्रामीण भागातील सिद्धापूर, मरवडे, डोणज, नंदूर, सलगर बुद्रूक, भोसे, नंदेश्‍वर, आंधळगाव, खुपसंगी, खोमनाळ, निंबोणी, बावची, मारोळी, लवंगी, हुन्नूर, गोणेवाडी, डोंगरगाव, ब्रह्मपुरी, माचणूर, लक्ष्मी दहिवडी, भाळवणी, रड्डे आदी गावांतील नागरिकांनी मशिदीत नमाज पठाण करून चांगला पाऊस व पीक पाणीसह सध्या जगावर घोंघवणाऱ्या कोरोनापासून मुक्ती व धार्मिक वादापासून सर्व समाजातील जनतेला सुखी ठेवण्याची दुवा अल्लाहकडे मागितली.

रमजाननिमित्त आ. समाधान आवताडे, विठ्ठलचे अध्यक्ष भगीरथ भालके, मा. आ. प्रशांत परिचारक, आवताडे स्पिनिंगचे संजय आवताडे, शहा बॅंकेचे अध्यक्ष राहुल शहा, "युटोपियन'चे उमेश परिचारक, "भैरवनाथ'चे अनिल ऊरुस कमिटीचे प्रशांत गायकवाड, बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड कोमल ढोबळे, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, तहसीलदार स्वप्नील रावडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पो. नि. रणजित माने, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, डॉ. प्रणिता भालके, अॅड. विनायक नागणे, सोमनाथ माळी, चंद्रकांत घुले, अजित जगताप, विजय खवतोडे, प्रवीण खवतोडे, सुधाकर मासाळ, प्रदीप खांडेकर, अॅड. संभाजी घुले यांच्यासह शशिकांत चव्हाण, तुकाराम कुदळे, अॅड. नंदकुमार पवार, ऍड. राहुल घुले, सतीश दत्तू, सुहास पवार, सुरेश पवार, संदीप बुरकुल, समाधान हेंबाडे, यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत शिरखुर्मा व गुलगुल्याचा आस्वाद घेत मोबाईल व सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

Web Title: Eidgah Maidan Muslim Community Namaj

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top