Solapur News : सोलापुरात मंगळवारपासून ‘इलेक्ट्रो २०२३’ प्रदर्शन

इलेक्ट्रो २०२३ या भव्य प्रदर्शनाचे आयोजन मंगळवार (ता. २४) ते सोमवार (ता. ३०) या कालावधीत करण्यात आले आहे
Electro 2023 exhibition on Tuesday in Solapur electric commodity
Electro 2023 exhibition on Tuesday in Solapur electric commoditysakal
Updated on

सोलापूर : इलेक्ट्रो २०२३ या भव्य प्रदर्शनाचे आयोजन मंगळवार (ता. २४) ते सोमवार (ता. ३०) या कालावधीत करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन, होम अप्लायन्सेस, सोलार सिस्टीम,

फिटनेस इक्विपमेंट क्षेत्रातील उत्पादनांचे हे प्रदर्शन स्मार्ट सिटी अंतर्गत उभारलेल्या विष्णू मिल कंपाउंड भागातील एक्झिबिशन ग्राउंडवर होणार असल्याची माहिती ‘सेडा’चे अध्यक्ष ईश्वर मालू व इलेक्ट्रोचे चेअरमन शिवप्रकाश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेस सेडाचे उपाध्यक्ष डॉ. सूरजरतन धूत, सचिव आनंद येमूल, सहसचिव सूर्यकांत कुलकर्णी, खजिनदार भूषण भुतडा व संचालक सुयोग कालाणी, गिरीश मुंदडा, विजय टेके, हरीश कुकरेजा, संदेश कोठारी, सुनील भांजे, संस्थेचे माजी अध्यक्ष केतन शहा, सतीश मालू, आनंदराज दोशी, दिलीप राऊत, दीपक मुनोत, श्री. कुलकर्णी, जितेंद्र राठी, कौशिक शाह, खुशाल देढिया आदी उपस्थित होते.

प्रदर्शनाचे उद्‌घाटन मंगळवारी (ता. २४) सायंकाळी पाच वाजता मेटझ इंडिया प्रा. लि.चे असिस्टंट जनरल मॅनेजर एस. विजय यांच्या हस्ते व महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या उपस्थितीत होईल. या प्रदर्शनाचे हे २३वे वर्ष आहे. हे प्रदर्शन दररोज दुपारी चार ते रात्री ९.३० व रविवारी सकाळी ११ ते रात्री ९.३० पर्यंत सुरू राहील.

या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून एलसीडी, एलईडी, कलर टीव्ही, फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, एअर कंडिशनर, म्युझिक सिस्टीम, वॉशिंग मशिन, डिश टीव्ही, मायक्रोव्हेव ओव्हन, व्हॅक्यूम क्लीनर, एअर कंडिशनर, सोलर सिस्टीम, गॅस गिझर, मोबाईल, आयपॅड, टेलिफोन, मिक्सर, फूड प्रोसेसर, आटा चक्की, एअर कूलर, वॉटर प्युरिफायर, स्टॅबिलायझर, चिमणी हुड, कॉम्प्युटर, फिटनेस इक्विपमेंट्‌स उपलब्ध असतील.

बजाज फायनान्स व इतर फायनान्सच्या माध्यमातून शून्य टक्के व्याज दराने कर्ज सेवा असेल. या प्रदर्शनात ३५० स्टॉल्स असतील. एक लाखापेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील. प्रदर्शनाचे यंदाचे खास आकर्षण म्हणजे सुमारे ३० टक्के स्टॉल्स हे विशेषरीत्या निर्मित वातानुकूलित दालनात असतील. ग्राहकांसाठी दररोज लकी ड्रॉ व शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ काढण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी व्हीलचेअर सेवा असेल. दररोज रक्तदान उपक्रम राबवला जाणार आहे. चार स्टॉल सामाजिक संस्थांना दिल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

प्रदर्शनाची वैशिष्ट्ये

- सोलापुरातील इलेक्ट्रो प्रदर्शनात एसी टेंट दुसऱ्यांदा सादर

- दररोज लकी ड्रॉ व शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ

- ग्राहकांसाठी फूड कोर्ट व पाणी सुविधा

- धूळमुक्तीसाठी सर्वत्र मॅट सुविधा

- दररोज रक्तदान उपक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com