आता एका बाटलीतून टोचली जाणार "इतक्‍या' जणांना लस

आता एका बाटलीतून टोचली जाणार अकरा जणांना लस
Corona Vaccine
Corona VaccineMedia Gallery
Updated on

सोलापूर : लसीच्या (Vaccine) एका बाटलीतून दहा व्यक्‍तींना लस टोचली जात होती. परंतु, लसीकरण केंद्रांवरील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व त्यांचे प्रबोधन केल्याने आता एका बाटलीत 11 व्यक्‍तींना लस टोचली जात आहे. त्यामुळे लस वाया जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यासाठी आतापर्यंत चार लाख 75 हजार 50 डोस मिळाले असून, सध्या शहर- जिल्ह्यातील 72 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. (Eleven people will now be vaccinated in one bottle)

कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या वाढली असून, मृत्यूदरही अधिकच वाढला. त्यामुळे लस टोचून घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मात्र तेवढ्या प्रमाणात लस उपलब्ध नसल्याने सहा ते आठ आठवड्यांत दुसरा डोस घेण्याचा निकष बदलला. आता 12 ते 16 आठवड्यांत (84 दिवसांत) दुसरा डोस घेण्याचा नवा निकष केंद्राकडून राज्याला पाठविण्यात आला. तर 18 ते 44 वयोगटातील व्यक्‍तींचे लसीकरणही बंद केले आहे. दरम्यान, सुरवातीला लसीच्या एका बाटलीत आठ ते दहा जणांना लस टोचली जात होती. परंतु, प्रत्यक्षात एका बाटलीतून 11 जणांना लस टोचली जाऊ शकते, याबद्दल तज्ज्ञांनी संबंधित कर्मचाऱ्यांना पटवून दिले. त्यानंतर आता लस वाया जाण्याचे प्रमाण पूर्णपणे कमी झाले आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू झाल्याची माहिती लसीकरणाचे जिल्हा समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

Corona Vaccine
"एमपीएससी'चे सरकारला पत्र ! रखडलेल्या नियुक्‍त्या अन्‌ परीक्षांबाबत केली विचारणा

आतापर्यंत जिल्ह्यातील 36 हजार 843 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तर 38 हजार 832 फ्रंटलाइन वर्कर्सना लसीचा पहिला डोस टोचण्यात आला आहे. तर 45 वर्षांवरील एक लाख 30 हजार 430 व्यक्‍तींनीही लस टोचून घेतली आहे. तीन लाख 55 हजार 293 जणांनी पहिला डोस तर एक लाख 900 जणांनी दुसरा डोस टोचून घेतल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

लसीकरणाची सद्य:स्थिती

  • आतापर्यंत मिळालेली लस : 4,75,050

  • एकूण केंद्रे : 72

  • सध्या शिल्लक लस : 12,700

  • ज्येष्ठांचे लसीकरण : 1,33,011

Corona Vaccine
राज्यात "मिशन ऑक्‍सिजन'ला सुरवात ! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धाराशिव प्रकल्पाचे उद्‌घाटन

पालकमंत्र्यांची फक्त ग्वाहीच !

जिल्हाभरात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे. बाधितांची संख्या कमी झालेली नाही तर मृत्यूदरही वाढू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर लसीकरण वाढविण्याशिवाय दुसरा पर्याय सध्यातरी दिसत नाही. लसीकरणासाठी केंद्रांवर गर्दीही वाढल्याचे चित्र आहे. लसीचा कोटा वाढवून मिळेल, अशी ग्वाही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली होती. मात्र, अजूनही लसीचा कोटा वाढवून मिळालेला नाही. सध्या शहरासाठी 7 हजार 500 तर ग्रामीण भागातील नागरिकांसाठी 12 हजार 700 डोस शिल्लक आहेत. केंद्रे वाढवून लसीकरणाचे उद्दिष्टे पूर्ण करण्याचे नियोजन असतानाही लसीअभावी सध्या शहर- जिल्ह्यातील 72 केंद्रांवरच लसीकरण सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com