
डॉ. श्रीकांत कामतकर
प्रिय लेकरा,
गर्भपिशवीत स्वप्नांची वाकळ पांघरून तू हुंदडत होतास तेंव्हापासून तुझ्या काळजीने माझी पाठ सोडली नाही ती आजपर्यंत. आज काय मदर्स डे आहे म्हणून तू तुझ्या डीपीवर माझ्या मांडीवर बसून, गोबऱ्या गालावर खळी पडणारा तुझा फोटो ठेवलायस, तो पाहून मला आठवलं.. लहानपणापासून काही मनाविरुद्ध झालं की अस्सं गाल फुगवून घर डोक्यावर घेण्याचं तुझं कसब, आता तू बाप होण्याएवढा मोठा झालास तरी तस्संच आहे.