
कोळा : घरातील मंडळींनी लग्न ठरवल्यामुळे कोळा (ता. सांगोला) येथील जवान ४० दिवसांच्या सुटीवर तो आला.... ५ मे रोजी लग्न झाले... युद्धजन्य परिस्थितीमुळे दुसऱ्याच दिवशी सैन्यदलाच्या सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या... सर्वांना कर्तव्यावर हजर राहण्याचा संदेश देण्यात आला... या संदेशानुसार अंगावरील हळदही सुखली नसलेल्या कोळा येथील जवानालाही कर्तव्यावर जाणे भाग पडले... या भावनिक प्रसंगी कुटुंबीयांसह कोळा ग्रामस्थांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या... अंगावरची हळद निघण्यापूर्वीच तो राजस्थानमध्ये रणगाडा चालवण्यास जात आहे... आज दुपारी कोळा येथील जवान योगेश आलदर ऑपरेशन सिंदूर मोहिमेसाठी मिरज येथून रेल्वेने रवाना झाला.