Solapur : एसटीच्या 512 कर्मचाऱ्यांना वेतन! संपकऱ्यांची झोळी रिकामीच

एसटीच्या 512 कर्मचाऱ्यांना वेतन! संपकऱ्यांची झोळी रिकामीच
एसटीच्या 512 कर्मचाऱ्यांना वेतन! संपकऱ्यांची झोळी रिकामीच
एसटीच्या 512 कर्मचाऱ्यांना वेतन! संपकऱ्यांची झोळी रिकामीचsakal
Summary

सोलापूर विभागातील एसटीच्या एकूण 3 हजार 900 कर्मचाऱ्यांपैकी केवळ 512 कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचे नव्या वेतनश्रेणीनुसार वेतन देण्यात आले.

सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या (Maharashtra State Transport Corporation) सोलापूर (Solapur) विभागातील एसटीच्या एकूण 3 हजार 900 कर्मचाऱ्यांपैकी केवळ 512 कर्मचाऱ्यांच्या खात्यावर नोव्हेंबरचे नव्या वेतनश्रेणीनुसार वेतन खात्यात जमा झाले आहे. उर्वरित 3 हजार 388 संपकरी कर्मचाऱ्यांची 'झोळी' रिकामीच राहिली आहे. परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना नव्या वेतन श्रेणीनुसार वेतन देण्यात आले.

एसटीच्या 512 कर्मचाऱ्यांना वेतन! संपकऱ्यांची झोळी रिकामीच
स्वत:चा व्यवसाय करायचाय? सरकार करेल मदत; आता चुटकीसरशी होतील कामे

मागील काही दिवसांपासून सोलापूर विभागातील बार्शी, पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर या आगारातून एसटीची सेवा हळूहळू सुरू झाली आहे. सोलापूर विभागातील संपापूर्वी दररोज दो हजार एसटीच्या फेऱ्या होत होत्या. मात्र कोरोनाची दुसरी लाट ओसरताच एसटी प्रवासी वाहतूक सेवा पूर्वपदावर येत होती. कोरोनानंतर सोलापूर विभागांकडून 1 हजार 700 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. सोलापूर विभागात एकूण 3 हजार 900 कर्मचारी आहेत. यामधील एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलिनीकरण करावे या मुख्य मागणीसाठी महिनाभरापासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. संपकाळात त्यातील काही कर्मचाऱ्यांचे निलंबन तर काही कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सोलापूर विभागातील सुधारित वेतन श्रेणीनुसार 512 कर्मचाऱ्यांनी मान्य केले आहे. तर उर्वरित कर्मचारी मात्र संपाच्या बाजूने आहेत. एसटी महामंडळाच्या वतीने परिवहन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी वाढविण्याची घोषणा 24 नोव्हेंबर रोजी केली होती. त्याची अंमलबजावणी नोव्हेंबरच्या पगारापासून झाली आहे.

सोलापूर विभागातील नऊ आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी 4 नोव्हेंबरपासून संप पुकारला आहे. याला शंभर टक्के प्रतिसाद लाभला. मात्र, यातील काही कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन मान्य आहे अशा कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर येणे पसंत केले आहे. अशा सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन सुधारित पद्धतीने करण्यात आले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. सोलापूर जिल्ह्यामध्ये एसटीची सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. यासाठी एसटी महामंडळाने सर्व कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन केले आहे. मात्र काही कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असून, संप सुरू आहे. चालक आणि वाहकांची नोव्हेंबरची सेवा लक्षात घेऊन त्यांच्या खात्यामध्ये 7 नोव्हेंबर रोजी सुधारित वेतन जमा करण्यात आले आहे. मात्र इतर चालक-वाहक प्रशासकीय तसेच कार्यशाळेतील कर्मचारी अद्यापही संपावर ठाम असल्याने एसटीच्या फेऱ्या पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास आणखीन किती दिवसांचा कालावधी लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे एसटीच्या फेऱ्या बंद असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय सुरू आहे. याचा लाभ मात्र अवैध प्रवासी वाहतूकदार घेत आहेत.

एसटी संपकरी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद देताना परिवहन मंत्री यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता 12 टक्‍क्‍यांवरून 28 टक्‍के करण्यात आला, घरभाडे भत्ता 8-16-24 या पटीत वाढवून देण्यात आला. तसेच अंतरिम वेतन वाढ देखील दिली. त्यानुसार मंगळवारी (ता. 7) नियमित कामांवर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन (नोव्हेंबर पेड इन डिसेंबर) अदा करण्यात आले आहे.

एसटीच्या 512 कर्मचाऱ्यांना वेतन! संपकऱ्यांची झोळी रिकामीच
कोठे, शेख, चंदनशिवेंचे 'या'वेळी पक्षांतर! कॉंग्रेसचे बेरियाही...

आकडे बोलतात

  • एकूण बस : 690

  • एकूण आगार : 9

  • एकूण कर्मचारी : 3900

  • कामावर हजर असलेले कर्मचारी : 512

  • वेतन न मिळालेले कर्मचारी : 3 हजार 388

  • निलंबित कर्मचारी : 275

  • सेवासमाप्ती कर्मचारी : 28

  • कर्मचाऱ्यांच्या बदल्या : 51

एसटी कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबरचे वेतन खात्यावर जमा झाले आहे. जे कर्मचारी नियमित कामावर हजर होते त्यांच्या खात्यावर नव्या वेतनश्रेणीनुसार वेतन जमा झाले आहे. तरी उर्वरित कर्मचाऱ्यांनी देखील कामावर हजर राहावे.

- विलास राठोड, विभाग नियंत्रक, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com