
Solapur News : ऑनलाइन ऑर्डरनुसार हॉटेल्समधील खाद्यपदार्थ घरपोच करणाऱ्या झोमॅटो या कंपनीत जॉब फॉर युथ या संस्थेमुळे १५ दिव्यांग बांधवांना रोजगार मिळाला आहे. बजाज कंपनीने या दिव्यांग बांधवांना तीनचाकी इ-सायकल दिल्या आहेत. यामुळे शहरातील १५ दिव्यांग बांधव आत्मनिर्भर बनले आहेत.