अक्कलकोट - अलीकडे लग्न समारंभ व इतर कार्यक्रमात मोठा गाजावाजा करून अनावश्यक खर्च करण्याची प्रथा पडत चालल्याच्या पार्श्वभूमीवर चपळगाव येथे साखरपुड्यातच लग्न करून नाहक खर्चाला फाटा देण्यात आला..रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या गोरज मुहूर्तावर साखरपुड्याऐवजी लग्न करण्यात येऊन समाजापुढे वधू-वरांच्या कुटुंबीयांनी एक आदर्श ठेवला. उपस्थित सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी याबाबतीत पुढाकार घेतला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.रविवारचा दिवस शुभ मुहूर्ताचा असल्याने अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यादिवशी साखरपुडा मुहूर्त होता पण लग्नाचा तिथी नसतानाही बऱ्हाणपूर येथील नागेशी परिवार तर शिरवळ येथील तानवडे परिवारातील सदस्यांनी एकत्रित येत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या विचारविनिमयातुन साखरपुड्यातच लग्न ओळखण्याचा निर्णय घेतला..जिल्हा परिषदेचे माजी पक्षनेते आनंद तानवडे,शिरवळचे माजी सरपंच बसवराज तानवडे, चपळगावच्या सरपंच वर्षा भंडारकवठे व सामाजिक कार्यकर्ते सिद्धाराम भंडारकवठे दोन्ही कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून साखरपुड्याच्या कार्यक्रमांमध्ये लग्न करण्याबाबतचा प्रस्ताव वधू-वरांच्या कुटुंबीयांपुढे ठेवला.अचानक आलेला प्रस्ताव जरी असला तरी वधू-वरांच्या कुटुंबीयांनी चर्चा करून हा प्रस्ताव मान्य करून साखरपुड्यामध्येच लग्न करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सायंकाळी सहा वाजण्याचा गोरज मुहूर्त निवडण्यात आला. रविवारी सायंकाळी सहा वाजता उपस्थित दोन्ही कुटुंबातील नातेवाईक, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व निवडक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत लग्न करण्यात आले..अक्कलकोट तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील परमेश्वर नागेशी यांची मुलगी प्रिती तर शिरवळ येथील विश्वनाथ तानवडे यांचा मुलगा संतोष या दोघांचा साखरपुड्यातच लग्न करण्यात आले.दोन्ही परिवाराची वाटचाल ही शेतीवरच अवलंबून आहे.सध्याचे दिवस हे महागाईचे आहेत. सर्वसामान्यांना शुभकार्य करत असताना कंबरडे मोडले जात आहे. ही वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन उपस्थित सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी साखरपुड्यातच लग्न उरकण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने घेतला. यामुळे अनावश्यक खर्च, वेळ व शारीरिक कष्ट वाचले गेले..यासाठी विजय तानवडे, बसवराज तानवडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद तानवडे, सरपंच वर्षा भंडारकवठे, सिध्दाराम भंडारकवठे, राजु कोळी, राजु जवळगे, प्रशांत तानवडे, बसवराज बिराजदार, परमेश्वर बिराजदार, शिवा तानवडे, जाफर मुल्ला, अजित वदलुरे, विजय बिराजदार, निलप्पा तानवडे, कस्तुरी तानवडे, लक्ष्मी तानवडे, अजित तानवडे, संतोष भंडारे, शंकराचार्य मठपती, पंचप्पा चितळे, सरपंच गौस मुजावर, उपसरपंच पद्मसिंह बनसोडे, खय्युम पिरजादे, सैद पिरजादे, गफ्फार पिरजादे, माजी सरपंच कविता हाल्लोळे, अश्रफ अली पटेल, अब्दुलहमीद पिरजादे, शाम बंदिछोडे, रवि इरवाडकर, नागेश बऱ्हाणपूरकर, मानप्पा गूगळे आदींनी विचार करून हा निर्णय घेतला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.