करमाळा तालुक्‍यात प्रवेश करताय? मग ही बातमी वाचाच... 

karmala taluka
karmala taluka

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा तालुक्‍याला लागून असलेल्या पुणे, अहमदनगर व उस्मानाबाद या तीनही जिल्ह्यातून करमाळा तालुक्‍यात एकूण 43 लहान मोठे रस्ते येतात. या सर्व प्रमुख व ग्रामीण रस्त्यावर 24 तास कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी दिली आहे. 
पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे म्हणाले, की कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर या 43 रस्त्यांपैकी सहा मोठे रस्ते फक्त अत्यावश्‍यक सेवेसाठी व मालवाहतुकीसाठी चालू ठेवण्यात आलेले आहेत. या रस्त्यांवर पोलिसांची 24 तास नाकेबंदी चालू असून सर्व येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची व लोकांची कसून तपासणी केली जात आहे. तसेच उर्वरित एकूण 37 रस्ते पूर्ण बंद केले असून बंद केलेल्या रस्त्यावरून खोडसाळपणे कोणी वाहतूक करू नये म्हणून प्रत्येक रस्त्याला दोन अशा एकूण 74 विशेष पोलिस अधिकाऱ्यांच्या व पेट्रोलिंगसाठी स्वतंत्र तीन पोलिस मोबाईल व्हॉनची 24 तास नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, वरील 43 रस्ते चालू/बंद ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. 

वाहतुकीसाठी बंद असलेले 37 रस्ते 
रामवाडी ते बाभूळगाव, रामवाडी ते खानोटा रेल्वे ब्रिज, कावळवाडी ते बाभुळगाव, कावळवाडी ते शिंपोरा, कावळवाडी ते मानेवाडी, कावळवाडी ते करपडी, घरतवाडी ते करपडी, सावडी ते गाडे वस्ती ते चिलवडी, सावडी ते भराटे वस्ती ते चिलवडी, सावडी ते चिलवडी, गोरेवाडी ते डोंबाळवाडी, गोरेवाडी ते चिलवडी, कोर्टी ते आळसुंदे, हुलगेवाडी ते डोंबाळवाडी, लिंबेवाडी ते फुंदेवाडी ते शेगूड, रावगाव ते डुकरेवाडी ते शेगूड, वंजारवाडी ते महाळंगी, वंजारवाडी ते डोंबाळवाडी, मोरवड ते डोंबाळवाडी, मोरवड ते महाळंगी, पुनवर ते मसूदपूर ते लोणी, खडकी ते दिघी, रडगाव ते कोकरवाडी, तरडगाव ते जवळा, पाडळी ते धोत्री ते जवळा, पाडळी ते जवळा ते जामखेड, घारगाव ते धोत्री, घारगाव ते कोकरवाडी, वाघाचीवाडी ते आलेश्वर, करंजे ते आलेश्वर, भालेवाडी ते बंगळवाडी, बोरगाव ते पाचवड, दिलमेश्वर ते आलेश्वर, मिरगव्हाण ते बंगाळवाडी, आवाटी ते रोसा, आवाटी ते डोमगाव, नेरले ते भोत्रे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com