
मंगळवेढा (सोलापूर) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्यामुळे कोरोना संकटातही सौदे बंद असतानाही नऊ महिन्यांत 20 हजार शेतकऱ्यांनी विक्रीतून 20 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल केली आहे, अशी माहिती मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सोमनाथ अवताडे यांनी दिली.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या जनावरांच्या बाजाराच्या उद्घाटनप्रसंगी श्री. अवतोड बोलत होते. अध्यक्षस्थानी दत्तात्रय जमदाडे होते. या वेळी उद्योजक संजय आवताडे, खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे, सहाय्यक निंबधक प्रमोद दुरगुडे, माजी सभापती प्रदीप खांडेकर, सरोझ काझी, सुधाकर मासाळ, विष्णुपंत अवताडे, राजेंद्र सुरवसे, येताळा भगत, "दामाजी'चे संचालक लक्ष्मण जगताप, सचिन शिवशरण, भुजंग आसबे, लक्ष्मण मस्के, रामचंद्र कौडूभैरी, भारत नागणे, ज्ञानेश्वर कोंडूभैरी, युवराज शिंदे, सुहास पवार, ज्ञानेश्वर भगरे, महादेव जाधव, भारत निकम, सचिव सचिन देशमुख, केशव अवताडे आदींसह संचालक, शेतकरी व बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
अध्यक्ष सोमनाथ अवताडे पुढे म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक बबनराव अवताडे व दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे यांनी दिलेल्या संधीचा आपण पुरेपूर लाभ घेत शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांचा बाजार समितीवरील विश्वास वाढीस लागला आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला आधारभूत किंमत मिळावी म्हणून सुरू करण्यात आलेल्या मका, तूर, हरभरा या हमीभाव केंद्राला देखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सध्या ग्रामीण भागातील नंदेश्वर व लक्ष्मी दहीवडी येथील बाजार समितीच्या आवारात व्यापारी गाळे उभा करून भविष्यात या भागातील तरुणांना व्यवसायाच्या रूपाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
विद्यमान संचालक मंडळाने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेताना बाजार समितीच्या आवारात डाळिंब सौदे सुरू केले. डाळिंबासाठी नव्याने व्यापारी गाळे, अंतर्गत डांबरीकरण, आठवडा बाजार यासह अनेक सुविधा शेतकऱ्यांना व नागरिकांना दिल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांबरोबर शेजारच्या तालुक्यातील शेतकऱ्यांचा देखील विश्वास वाढीस लागला आहे. त्यामुळे आता जनावरांचा बाजार सुरू करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. शिवाय भविष्यात तालुक्यातील द्राक्ष पिकाचे क्षेत्र वाढले आहे, त्यामुळे बेदाण्याचे सौदे सुरू करण्याचा मानस आमच्या संचालक मंडळाचा आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.