Solapur News : सोलापुरात रस्ते चौकांना आजही ब्रिटिशकालीन अधिकाऱ्यांची नावे

साईक्स रोड, प्रोव्हिन्शनल रोड नावे अनेकांना नवखी; १९४६ला तर होती शहरात रिक्षावर बंदी
solapur road palce name
solapur road palce namesakal

Solapur News : सोलापुरातील अनेक ठिकाणे अशी आहेत, ज्यांचा आपण बोलताना सर्रास वापर करतो, पण ती नावे त्याला का ठेवण्यात आली, याचा आपण कधी विचार करीत नाही. केला असला तरी त्याचे निराकरण होत नाही. साईक्स रोड, प्रोव्हिन्शनल रोड ही नावे कशी पडली याचा हा लेखाजोखा.

१९३२ साली सोलापूरचे रेल्वे स्थानक ते पांजरापोळ चौक म्हणजे सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करण्याचा ठराव करण्यात येत पीडब्ल्यूडी आणि म्युनिसीपलिटी यांनी निम्मे निम्मे पैसे भरत हा रस्ता या वर्षी करण्यात आला.

परंतु त्यापूर्वी मेकॅनिकी चौक ते फौजदार चावडी हा रस्ता सोलापूरच्या इतिहासातला पहिला डांबरीकरण केलेला रस्ता याचवर्षी करण्यात आला. या रस्त्याच्या खर्चाच्या अंदाजावरून पुढील रस्त्यांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते.

गव्हर्नर साईक्स यांचे सोलापुरात आगमन होणार होते त्यासाठी रंगभवन परिसरातील मिशन कंपाउंडच्या पश्चिमेकडील रस्त्याला साईक्स रोड असे नाव देण्यात आले. हुतात्मा जगन्नाथ शिंदे यांच्या नावावर शिंदे चौक तयार झाला.

बाळीवेस ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्याचे नाव महात्मा गांधी रस्ता आहे. रेल्वे स्टेशन ते भागवत थिएटरमार्गे शिवाजी चौकापर्यंतच्या रस्त्याला प्रोव्हिन्शनल रोड हे नावही अधिकाऱ्याच्या नावावरूनच ठेवण्यात आले होते.

सायकलवरती कर बसू नये हा ठरावही याच वेळी पारित करण्यात आला. तसेच रिक्षाची पद्धत माणुसकीला सोडून आहे त्यामुळे शहरात रिक्षा सुरू करू नये असा ठरावही १९४६ ला म्युन्सिपाल्टीने केला होता. त्याकाळी इतकी साक्षरता नसल्याने आणि रिक्षा हा प्रकार नविन असल्याने लोकांच्या पचनी पडत नव्हता. त्यामुळे नागरिकांचाही रिक्षांना प्रतिसाद मिळत नव्हता.

solapur road palce name
Solapur News : निकृष्ट कामाचा नागरिकांकडूनच पंचनामा; चोखामेळा व सप्तशृंगी नगरमधील रहिवाशांकडून लेखी तक्रार

सोलापूरच्या इतिहासातील घटना अशा

  • १ जून १८५३ साली नगरपालिकेने शहरातील रस्त्याच्या कामासाठी कैदी मिळावेत, अशी मागणी सरकारकडे केली होती.

  • १८७१ मध्ये शहराच्या विविध रस्त्यावर केरोसीनचे ३२ दिवे लावण्यात आले.

  • १९२३ ला हॅच रोडवर प्रायमरी स्कूलची नवी इमारत बांधण्यात आली.

  • १९५१ सालापासून शहरातील विविध रस्त्यांवर मर्क्युरी लाइट्स लावण्यात आल्या.

  • १९५२ साली नगरपालिकेने डिझेलवरच्या आठ नव्या बस चालू केल्या.

मेकॅनिकी चौक, गोल्डफिंच पेठ, मेसॉनिक हॉल ही नावे नविन नाहीत. यांचा वापर कायम होतो. तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नावावर ही नावे ठेवण्यात आली. मीठ गल्लीत मिठाचा व्यवसाय चालत असल्याने ते नाव पडले. सोलापुरात ब्रिटिशांचे राज्य असताना अशी नावे देण्यात आली.

- संगप्पा चन्नप्पा बुरकुले, ज्येष्ठ नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com