दिलासादायक! पेट्रोल, डिझेल सर्वांनाच मिळणार, फक्त ‘ही’ अट 

Everyone will get petrol in Solapur
Everyone will get petrol in Solapur
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील (ग्रामीण व शहर मधील प्रतिबंधित क्षेत्र वगळून) पेट्रोल व डिझेलपंप सकाळी 7 ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू राहणार आहेत. पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी आता ओळखपत्राची किंवा पासची आवश्यकता असणार नाही. सर्वांना पेट्रोल व डिझेल देण्याचा आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला आहे. 
पेट्रोल, डिझेलचा पुरवठा करत असताना सोशल डिस्टन्सचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी संबंधित पेट्रोल व डिझेल पंप चालकावर सोपविण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल-डिझेल पंप शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या विहित वेळेमध्ये सुरू राहतील असा आदेशही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील पोलीस आयुक्तालयाची हद्द वगळून व ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर भागातील अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने व अस्थापना सकाळी 7 ते सायंकाळी सात या वेळेत सुरू ठेवण्याचाही आदेश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिला आहे. या शिवाय अत्यावश्यक सेवेत न मोडणारी दुकाने व अस्थापना देखील सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरू राहणार आहेत. बिगर अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू ठेवण्यासाठी त्यांना व्यवसायाची दिवस निश्चित करून देण्याची जबाबदारी त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपविण्यात आली आहे. बिगर अत्यावश्यक सेवेची दुकाने व अस्थापना ज्यातून विक्री करण्याचे साहित्य (उदा. हार्डवेअर, कपडे, भांड्याची दुकाने इत्यादी वर्गवारीतील दुकाने) दररोज उपलब्ध होतील असे नियोजन त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्था (नगरपालिका/नगरपंचायत/नगरपरिषद/ ग्रामपंचायत) यांनी करावे अशी सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केली आहे. 

मद्यविक्रीबाबत प्रतीक्षाच
मद्य विक्रीच्या निर्णयाबाबत अद्याप प्रतीक्षाच सोलापूर शहर व जिल्ह्यातील देशी - विदेशी मद्य विक्रीच्या दुकानाबाहेर सोशल डिस्टन्ससाठी मार्किंग केल्याने जिल्ह्यातील मद्य विक्रीची  दुकाने सुरू होणार अशी शक्यता निर्माण झाली होती. मद्य विक्री बाबत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त यांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता. सोलापूर शहर व  जिल्ह्यातील मद्य विक्रीच्या आदेशाबाबत आणखीन काही दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur Tour May Decide Fate of Long-Pending Rail Project
Political Heat Rises in Solapur; Decision on MLC Candidate Likely Soon
drug
Students
Marathi News Esakal
www.esakal.com