esakal | सुटलो! सोलापुरात कोरोना अन्‌ "सारी' निगेटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

"मरकज'ला गेलेल्या 22 जणांची दुसरी टेस्टही निगेटिव्ह 
दिल्ली येथील निजामुद्दिन परिसरात तबलिके जमातच्या मरकजमध्ये (केंद्रात) झालेल्या मेळाव्याला सोलापूर जिल्ह्यातील 53 जण सहभागी झाले होते. या 53 जणांची पहिली कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. शासनाच्या आदेशानुसार पहिली टेस्ट झाल्यानंतर आठ दिवसांनी दुसरी टेस्ट घेतली जात आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये 53 पैकी 22 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित व्यक्तींचीही तपासणी केली जात आहे. 
- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर

सुटलो! सोलापुरात कोरोना अन्‌ "सारी' निगेटिव्ह 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : संपूर्ण जग कोरोना विषाणूसोबत लढाई करत असताना औरंगाबादमध्ये सारी (सिव्हीयरली अक्‍यूट रेस्पिरेटरी इलनेस) आजाराने थैमान घातले आहे. कोरोना सारखीच लक्षणे असलेल्या सारी आजारामुळे औरंगाबादमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात मात्र कोरोना आणि सारीच्या रुग्णांची तपासणी निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

हेही वाचा - कोरोनापेक्षाही भयंकर : औरंगाबादेत "सारी'चे 137 रुग्ण, 11 मृत्यू 

दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील वांगी गावाच्या हद्दीत असलेल्या बेदाणा शेडवर काम करणारा युवक ग्वाल्हेर येथे गेल्यानंतर कोरोना बाधित असल्याचे आढळले. त्यानंतर त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 56 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यापैकी 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित 46 जणांचे अहवाल आज (शुक्रवारी) रात्री उशिरा अथवा उद्या (शनिवार) प्राप्त होणार आहेत. कोरोनाची चाचणी सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत केली जात आहे. या प्रयोगशाळेत सोलापूरसह शेजारच्या उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातीलही नमुने तपासणीसाठी येऊ लागल्याने वांगी परिसरातील नमुन्यांच्या तपासणीला विलंब लागण्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

loading image