कोरोना काळात काढा आयुर्वेदिक पेय 

corona kadha.jpg
corona kadha.jpg
Updated on

सोलापूर : कोरोना विषाणू फुफुसांवर आघात करून त्यात द्राव्य तयार करतो. ज्यामुळे शरीराला श्‍वास घेण्यास व प्राणवायू मिळण्यास अडचण निर्माण होते. आयुर्वेदात वर्णन केलेल्या अशा तीन वनस्पतींना खूप महत्त्व आहे. सुंठी ह्यायचे विश्‍व भेषज/महा औषध म्हणून वर्णन आहे. कारण, ते सर्व रोगांवर उपयुक्त ठरते. गुडुचीलाचे वर्णन अमृत असे असल्याने ते अमृतासमान आहे. तुळस शब्दाचा अर्थ "अतुल्य' असून विष्णू प्रिय आहे. अशा तीन औषधांचे अनुसंधान करून ते वेगवेगळ्या विषाणूकरिता उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले. (एच-1 एन-1 आणि स्वाइन फ्लू साथीच्या काळात तुळशीचा ऍन्टिव्हायरल प्रभाव सिद्ध झाला आहे.) तुळस असेल तेथील हवा शुद्ध व पवित्र असते. तुळशीच्या पानातील विशिष्ट तेलाने विषाणूमुक्त व शरीर शुद्ध होते. तुळशीजवळ बसून प्राणायाम केल्याने कीटकांचा नाश होऊन शरीरात बल, बुद्धी, लॉज यांची वृद्धी होते. अनुशापोटी तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने तेज व स्मरणशक्ती वाढते. तुळशीचे पानात उत्कृष्ट रसायन असून ते उष्णता व त्रिदोषनाशक आहे. रक्तविकार, ताप, खोकला, वायू व कृमींचा नाश करणारी व हृदयास हितकर आहे. तुळशीच्या पानांपासून तयार केलेल्या काढ्याविषयी डॉ. देविका डोंगकर आणि डॉ. कमलेश कुकरेजा म्हणाले, मध ही निसर्गाने मानवाला दिलेली उत्तम भेट असून पंचामृतापैकी एक अमृत आहे. आयुर्वेदातील अधिकांश औषधासाठी श्रेष्ठ अनुपान आहे. मधात नैसर्गिकरीत्या भरपूर प्रमाणात साखर असते. मध माउस पेशींना त्वरित उष्णता व शक्ती देऊन बळ प्रदान करते. मधाने पोट साफ होऊन जिवाणूंचा नाश होतो. टायफड रुग्णांसाठी मध उत्तम औषध आहे. मध हजारो वर्ष खराब होत नाही. मुलांच्या विकासात खूप उपयोगी आहे. मधात असणारी खनिजे, तत्त्वे रक्तातील लाल कणांच्या वाढीस मदतरूप ठरतात. रुग्णांना मध शक्ती देते. 
मध आणि आल्याचा रस सेवन केल्याने दमा, सर्दी वेदना कमी होतात. 
सूंठ : अखंड सूठ घालून तापवलेले पाणी थंड करून दोन वेळा गाळून घेतल्याने जुनी सर्दी, दमा, धाप लागणे, उचकी, अजीर्ण, अपचन, कृमी, झुला, चिकट, आमदोष, डायबिटीस, रक्तदाब कमी होतो. डोकेदुखीसारख्या कफदोषजन्य रोगांत अवश्‍य लाभ होतो. 
जाड सालीची दालचिनी लघू उष्ण, तिखट, मधुर, कडवट वृक्ष आणि पित्तकारक आहे. ती कफ वायू व रुची नष्ट करणारी आहे. मूत्राशयाचे रोग, मूळव्याध, सर्दी दूर करणारी तसेच हृदयरोगासाठी उपयोगी आहे. दालचिनीचे सेवन केल्याने अजीर्ण, उलटी, मळमळणे, पोटात कळ येणे, पोट फुगणे हे विकार दूर होतात. दालचिनी मिरे व आले उकळून काढा प्यायल्यास सर्दी दूर होते. 
लवंग : वैज्ञानिकांच्या मते लवंग गरम, उत्तेजक व पोटातील उष्णता नाहीशी करणारी आहे. लवंग गरम पाण्यात भिजवून पाणी प्यायला दिल्याने उलट्या होत नाहीत. लवंग तेलाचा फायदा होतो. लवंगेचा अर्क काढून त्यातून सुगंधित पदार्थ तयार करण्यात येतात. लवंग तेल जंतूनाशक म्हणून वापरतात. काढा आयुर्वेदिक पेय वन्हौ तु कवथितं द्रव्यम श्रुतमाहू चिकित्सका: औषधी द्रव्य अग्नीच्या सहाय्याने पाण्यात उकळून जे पेय तयार होते ते म्हणजे काढा. 

काढा तयार करायची पद्धत 
द्रव्य एक भाग + चार पट पाणी घेऊन अर्धा होईपर्यंत उकळावे, गाळून उपयोग करावा. 
काढा, श्रुत, काषय, निर्युह हे काढ्याचे पर्यायी शब्द आहेत. 
आयुर्वेद शास्त्र मुख्यतः त्रिदोष सिद्धांतवर अवलंबून आहे. वात, पित्त, कफ हे त्रिदोष आहेत. "दोष' शब्द हे ऊर्जा अर्थी वापरला आहे. निसर्गात जसे सूर्य, चंद्र आणि वारा तसे शरीरात पित्त, कफ आणि वायू आहेत. काढा हे प्रकृतीला अनुसरून घेतल्यास उत्तम उपयोग होतो. त्यामुळे एक प्रकारचा काढा सर्वांना उपयोगी होत नाही, किंबहुना चुकीचा काढा घेतल्यास त्रास हाऊ शकतो. 

घरगुती काढा प्रकृती अनुसार 
1. वातप्रधान प्रकृती - शुंठ (विश्‍व भेषज) + गूळ 
2. पित्तप्रधान प्रकृती- गुडुची (अमृता)+ खाडी साखर 
3. कफप्रधान प्रकृती - तुळस (विष्णू वल्लभ)+ मध 
एका व्यक्तीसाठी 10 ग्राम द्रव्य घेऊन त्यात 50 मिली पाणी घालून 25 मिली होईपर्यंत उकळून आपल्या गरजेप्रमाणे गूळ/ खडी साखर/ मध घालून प्यावे. सकाळी व संध्याकाळी याचा वापर करावा. 

काढा पिण्याचे फायदे 
1. रोगप्रतिकार शक्तीवर्धक 
2. भूक वाढते व पचन प्रक्रिया सुधारते 
3. ऊर्जा वाढते 
4. नित्य सेवन केल्याने शरीराची एका प्रकारे शुद्धी होते 
5. श्‍वसन व त्वचा संबंधित अलेर्गीक तक्रारी कमी होतात. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com