
माढा : अंजनगाव खेलोबा (ता. माढा) येथे वीज पडून बाळासाहेब माणिक पाटील (वय ५४) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून दोन महिला जखमी झाल्या आहेत. अंजनगाव खेलोबा येथील बाळासाहेब पाटील हे वस्तीवर शेतामध्ये काम करत असताना सोमवारी (ता. १९) दुपारी पाचच्या सुमारास अचानक वीज कोसळली. बाळासाहेब पाटील यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जागेवरच ठार झाले.