
सोलापूर : कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ मिळवून देण्यासाठी सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या ''ॲग्रिस्टॅक फार्मर आयडी'' योजनेला काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकूण शेतकरी संख्या नोंदणी पाहता देशात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी तर राज्यात सोलापूर पाचव्या स्थानी आहे.