शेतकऱ्याची कमाल! चार महिन्यांत एक एकरात 4.80 लाखांचे टोमॅटो उत्पन्न

शेतकऱ्याची कमाल! चार महिन्यांत एक एकरात 4.80 लाखांचे टोमॅटो उत्पन्न
शेतकऱ्याची कमाल! चार महिन्यांत एक एकरात 4.80 लाखांचे टोमॅटो उत्पन्न
शेतकऱ्याची कमाल! चार महिन्यांत एक एकरात 4.80 लाखांचे टोमॅटो उत्पन्नCanva
Summary

गेल्या दीड महिन्यापूर्वी टोमॅटोला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांनी अक्षरशः रस्त्यावर टोमॅटो फेकून दिले. मात्र आज...

पोथरे (सोलापूर) : शेतकऱ्याची (Farmer) मेहनत आणि त्याला योग्य बाजारभाव मिळाला की शेतकरी सहज फायद्यात जातो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे बिटरगाव (श्री) (ता. करमाळा) (Karmala) येथील युवा शेतकरी वैभव विलास दळवी (Vaibhav Dalavi) यांचे आहे. दळवी यांना टोमॅटोला सात रुपयांपासून 35 रुपये किलो बाजारभाव मिळाल्याने चार महिन्यांत एक एकरात त्यांना तब्बल चार लाख 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

शेतकऱ्याची कमाल! चार महिन्यांत एक एकरात 4.80 लाखांचे टोमॅटो उत्पन्न
ग्रामसुरक्षा यंत्रणेची 'तेजस्वी' वाटचाल! 131 जणांनी बदलली जगण्याची वाट

गेल्या दीड महिन्यापूर्वी टोमॅटोला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांनी अक्षरशः रस्त्यावर टोमॅटो फेकून दिले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची शेती मोडून काढली. मात्र, वैभव दळवी यांनी आपल्या टोमॅटोच्या शेतीकडे लक्ष केंद्रित केले. त्यांनी 1 जुलै रोजी एक एकर क्षेत्रावर 2040 जातीच्या टोमॅटोची लागवड केली आहे. यासाठी त्यांना रोपे, खते, मल्चिंग पेपर, फवारणी, ठिबक, बांबू, बांधणी, मजूर आदींसाठी एक लाख रुपये खर्च झाला. पिकाला पाणी व्यवस्थापन व खत व्यवस्थापन वेळेवर झाल्याने पीक जोमदार आले व यातून त्यांना तब्बल 35 टन टोमॅटोचे उत्पादन निघाले आहे. त्यांना आणखी तीन टन उत्पादन निघेल अशी अपेक्षा आहे.

त्यांनी करमाळा, राशीन, मोडनिंब, कुर्डुवाडी बाजार समितीमध्ये टोमॅटोची विक्री केली आहे. या टोमॅटोला त्यांना सात रुपयांपासून ते 35 रुपये किलो बाजारभाव मिळाला आहे. यातून त्यांना आतापर्यंत चार लाख 80 हजार रुपयांचे उत्पन्न निघाले आहे व आणखी एक लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. त्यामुळे मेहनत व मालाला बाजारभाव मिळाला तर शेतकरी तोट्यातून सहज नफ्यात येऊ शकतो, हे दळवी यांनी दाखवून दिले आहे.

शेतकऱ्याची कमाल! चार महिन्यांत एक एकरात 4.80 लाखांचे टोमॅटो उत्पन्न
जिल्ह्यातील 362 दूध उत्पादक संस्थांचे पुनरुज्जीवन!

एखाद्या मालाचे बाजारभाव ढासळले की सर्व शेतकरी त्याकडे पाठ फिरवतात. हीच बाब लक्षात घेऊन आम्ही टोमॅटोला बाजारभाव नसतानाही याची लागवड केली. मात्र योग्य नियोजनामुळे जास्त उत्पादन व बाजारभाव चांगला मिळाल्याने आम्हाला उत्पन्न चांगले मिळाले.

- वैभव दळवी, युवा शेतकरी, बिटरगाव (श्री)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com