
सकाळ वृत्तसेवा
टेंभुर्णी : माढा तालुक्यातील जाखले येथे शेतीच्या वादातून पूर्व वैमनस्यातून रमेश बाबू लोंढे ( वय 56 रा. जाखले ता.माढा ) या शेतकऱ्यांचा धारदार कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जाखले ते रोपळे रस्त्यावरील सुभाष मारूती पवार यांच्या शेताजवळ घडली. या हत्येप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून टेंभुर्णी पोलीसांनी यातील सर्व आरोपींना अटक केली आहे.